महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कंगनासोबतच्या वादग्रस्त ई-मेल प्रकरणी ऋतिकची तब्बल तीन तास चौकशी

अभिनेता ऋतिक रोशनला  कंगना प्रकरणात समन्स बजावण्यात आला आहे. ऋतिक रोशनच्या तक्रारीच्या अनुषंगाने हा समन्स बजावण्यात आला आहे. मुंबई क्राईम ब्रांचतर्फे हा समन्स बजावण्यात आला होता.

By

Published : Feb 27, 2021, 12:14 PM IST

Updated : Feb 27, 2021, 3:43 PM IST

ऋतिक रोशन
ऋतिक रोशन

मुंबई- बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि कंगना रणौतमधील शीतयुद्ध आता कायदेशीर प्रकरणापर्यंत गेले आहे. अभिनेता ऋतिक रोशनला कंगना प्रकरणात समन्स बजावण्यात आला आहे. ऋतिक रोशनच्या तक्रारीच्या अनुषंगाने हा समन्स बजावण्यात आला आहे. मुंबई क्राईम ब्रांचतर्फे हा समन्स बजावण्यात आला होता. आज (शनिवारी) ऋतिक रोशनला जबाब नोंदवण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार ऋतिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला आहे.

ऋतिक रोशन मुंबई गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर

काय आहे कंगना- ऋतिक वाद

चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ मध्ये एका पत्रकार परिषदेत कंगनाने ऋतिकचा 'सिली एक्स' म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर भडकलेल्या ऋतिकने आपण कधी नात्यात नव्हतोच असा दावा केला. या दाव्यानंतर कंगनाने कंगनाने ऋतिक आपल्याला सतत इमेल पाठवून त्रास देत होता असा आरोप केला होता. तर आपण कंगनाला कोणतेही इमेल पाठवले नसल्याचा खुलासा ऋतिकने केला होता.यानंतर ऋतिकने त्याबाबत मुंबई पोलिसांच्या सायबर सेल कडेही तक्रार केली होती. ही केस आता सायबर सेलकडून सीआययुकडे ट्रान्सफर करण्यात आली आहे. आता ऋतिक रोशन याच्या तक्रारीचा नव्याने तपास सुरु झाला आहे. त्याच अनुषंगाने ऋतिकला त्याचा सविस्तर जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे

Last Updated : Feb 27, 2021, 3:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details