महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालाड दुर्घटना; वडिलांचे छत्र हरपल्याने मुलांना लागली शिक्षणाची चिंता

मालाडच्या पिंपरीपाडा येथे राहणारे मुर्तीकार दत्ता जाधव व त्यांची विवाहित मुलगी कोमल माने यांचा भिंत कोसळल्याच्या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. वडील आणि मोठया बहिणीच्या मृत्यूमुळे भेदरलेल्या जाधव कुटुंबातील मुलांना पुढचे शिक्षण कसे होणार असा प्रश्न सतावत आहे.

By

Published : Jul 3, 2019, 9:49 PM IST

मालाड दुर्घटना

मुंबई- मालाडच्या पिंपरीपाडा येथे राहणारे मुर्तीकार दत्ता जाधव व त्यांची विवाहित मुलगी कोमल माने यांचा भिंत कोसळल्याच्या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. वडील आणि मोठया बहिणीच्या मृत्यूमुळे भेदरलेल्या जाधव कुटुंबातील मुलांना पुढचे शिक्षण कसे होणार असा प्रश्न सतावत आहे. मंगळवारी झालेल्या या घटनेत अनेकांचे संसार उद्धवस्थ झाले आहेत.

मालाड दुर्घटना; वडिलांचे छत्र हरपल्याने मुलांना लागली शिक्षणाची चिंता

जाधव यांची पत्नी स्वाती या घरकाम करून कुटुंब सांभाळत होत्या. स्वाती जाधव या दुर्घटनेत वाचल्या आहेत. वडिलांचे छत्र हरपल्याने पोरके झालेल्या पाचवीत शिकणाऱ्या सुगंधा व सहावीत शिकणारा तिचा भाऊ अविनाश याला शाळेत केव्हा जायला मिळणार असा प्रश्न पडला आहे.

कुरारच्या चंद्रभागा विद्यालयात हे दोघेही शिक्षण घेत आहेत, तर त्यांची 7 वर्षांची लहान बहीण संध्या तिसऱ्या इयत्तेत शिकत असून तिच्या पायाला या घटनेत दुखापत झाली आहे. वडील आणि बहिणीच्या मृत्यूमुळे ही चिमुकली मुले भेदरलेली आहेत. मात्र त्यांना आपले पुढचे शिक्षण कस होणार ते कुठे राहणार हाच खरा प्रश्न त्यांना सतावतो आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details