महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Anil Parab : 24 ऑगस्टपर्यंत अनिल परब यांच्यावर कठोर कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

24 ऑगस्टपर्यंत अनिल परब यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करु नये असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी परब यांची 24 रोजी परत सुनावणी होणार आहे. त्यामुळ त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करु नये असे आदेश न्यायालयाने जारी केले आहेत.

High Court
High Court

By

Published : Jul 11, 2023, 11:03 PM IST

मुंबई :उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे आमदार तसेच माजी मंत्री अनिल परब यांनी बेकायदेशीररित्या साई हॉटेल बांधले. त्या संदर्भात अनेक बेकायदेशीर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या संदर्भात न्यायालयात आज सुनावणी पार पडली. अनिल परब यांच्यावर 24 ऑगस्टपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत.

तीन प्रकारच्या खटल्याप्रकरणी सुनावणी :अनिल परब यांच्यावर तीन प्रकारच्या खटल्याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. यामध्ये पर्यावरण मंत्रालयाने दाखल तक्रार केली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांनी देखील एफआयआर दाखल केली आहे. तसेच ईडीचे प्रकरण अशा एकूण तीन प्रकरणावर वेगवेगळ्या तारखांना सुनावणी होत असते. मात्र, आज न्यायालयाने या सर्व याचिका एकत्र करीत याच्यावर सुनावणी घेणे अधिक उचित असल्याचे निरीक्षण नोंदवले.


3 याचिकांवर एकत्रित होणार सुनावणी :दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल परब यांची हायकोर्टात याचिका दाखल झालेली आहे. या याचिकेमध्ये त्यांनी ईडीने बदनामी करण्यासाठी आणि हेतूतः कारस्थान करून त्रास देण्याच्या उद्देशाने हा खटला दाखल केल्याचे अनिल परब यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचा परब यांचा दावा त्यात आहे. ईडीने याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात अनिल परब यांचे नाव नसले नाही. मात्र, या कटाचे मुख्य सूत्रधार अशी त्यांची भूमिका असल्याचा ईडीचा आहे दावा.



कोणत्या आहेत त्या 3 याचिका ? : उबाठा शिवसेना विधानपरिषद सदस्य अनिल परब यांनी दाखल केलेली, ED विरोधातील याचिका ही पहिली याचिका आहे. रत्नागिरी पोलिसांनी दाखल केलेला खटल्यात खेड सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलेली याचिका ही दुसरी याचिका आहे. तर पर्यावरण आणी वन मंत्रालयाने दाखल केलेली तिसरी याचिका आहे. या तीनही याचिकांवर, न्यायमूर्ती एन. डब्ल्यू सांबरे, न्यायमूर्ती आर एन लढ्ढा यांच्या द्विसदस्य खंडपीठासमोर 24 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत अनिल परब यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

हेही वाचा -Relief To Anil Parab: साई रिसॉर्ट मनी लॉंड्रिंग प्रकरण; अनिल परबांना 21 जूनपर्यंत दिलासा

ABOUT THE AUTHOR

...view details