मुंबई - पर्यावरणाचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. विकासही झाला पाहिजे मात्र त्यासाठी यासाठी झाडे तोडण्याची गरज नाही. असे म्हणत ज्येष्ठ अभिनेत्री व मथुराच्या भाजप खासदार हेमामालिनी यांनी आरेतील वृक्षतोडीवर फडणवीस सरकारला घरचा अहेर दिला. मेट्रो कामामुळे मुंबईच्या सध्याच्या स्थितीबाबत विचारले असता, मुंबईत विकासकामे होत आहेत. मेट्रो प्रकल्प येत आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. मात्र, ही असुविधा त्यांनी आत्ता सहन केली तर, त्यांनी पुढील ५० वर्षे त्रास होणार नाही असे त्या म्हणाल्या.
बोरिवलीत आयोजित महिला बचतगटांच्या वार्तालाप कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी प्रथम मराठी भाषेतून संवाद साधला. यावेळी आपल्याला कलाक्षेत्र आवडतं की राजकारण या प्रश्नावर उत्तर देताना, राजकारणापेक्षा मला कलाकार म्हणूनच मी आवडते. चित्रपटात डायरेक्टरने सांगितल्यानुसार काम करावे लागते. इथे मात्र, सर्व भूमिका मला वठवाव्या लागतात असे त्या म्हणाल्या.