महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईचा पाऊस: लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला स्टेशन रस्त्याला नदीचे स्वरूप

हे पाणी काढण्यासाठी तीन पंप लावण्यात आले असून यातील फक्त एक पंप सुरू आहे आणि दोन पंप बंद असल्यामुळे या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे याचा फटका मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.

By

Published : Jul 1, 2019, 5:17 PM IST

मुंबईचा पाऊस

मुंबई- आज सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचा फटका सामान्य मुंबईकरांना बसत आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी भरलेले पाहायला मिळत आहे. तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक धीम्या गतीने चालू आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला स्टेशन रस्त्याला नदीचे स्वरूप आले असून वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

मुंबईचा पाऊस; लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला स्टेशन रस्त्याला नदीचे स्वरूप

लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरलेले पाहायला मिळत आहे. या रस्त्याला जणू नदीचे स्वरूप प्राप्त झालेले दिसत आहे. या पाण्यामध्ये बच्चेकंपनी आनंद घेताना दिसत आहेत. हे पाणी काढण्यासाठी तीन पंप लावण्यात आले असून यातील फक्त एक पंप सुरू आहे आणि दोन पंप बंद असल्यामुळे या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे याचा फटका मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details