महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mahavikas Aghadi March : महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त; अडीच हजार पोलीस असणार तैनात

राज्याचे राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्रातील महापुरुषांचा सातत्याने अपमान (Insulting great men) होत असल्याने त्याविरोधात महाविकास आघाडी उद्या भायखळ्याच्या रिर्चड्सन क्रुडासपासून ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा (Mahavikas Aghadi March) काढणार आहे. या मोर्चासाठी मुंबई पोलिसांनी आता परवानगी दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उद्याच्या मोर्चासाठी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त (Heavy police presence) असणार आहे. सीआरपीएफच्या जवानांचा अतिरिक्त फौजफाटा देखील तैनात करण्यात येणार आहे.

Mahavikas Aghadi March
मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त

By

Published : Dec 16, 2022, 4:02 PM IST

मुंबई : महाविकास आघाडीचा महामोर्चा (Mahavikas Aghadi March) हा भायखळ्याच्या रिर्चड्सन क्रुडासपासून ते आझाद मैदानदरम्यान उद्या चोख बंदोबस्तात पार पडणार (Heavy police presence) आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या समोर एका ट्रकवरच सभा आयोजित करण्यात येणार आहे. या महामोर्चासाठी 2 ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. भायखळ्याच्या रिर्चड्सन क्रुडासपासून ते आझाद मैदानदरम्यान या ठरलेल्या मार्गावरून मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी मुंबई पोलीस प्रयत्नशील आहेत. (Insulting great men) या बंदोबस्तात 2 अतिरिक्त पोलीस आणि 4 ते 5 पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी तैनात असतील. हे अधिकारी हा महामोर्चादरम्यान बंदोबस्त हाताळणार आहेत. महामोर्चाच्या मार्गावर SRPFचा अतिरिक्त बंदोबस्तही लावण्यात येणार आहे. (Latest news from Mumbai)

फुटीरतेची बीजे पेरली :महामोर्चादरम्यान कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याकडे मुंबई पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. महामोर्च्याच्या दरम्यान खाजगी ड्रोन्सना बंदी आहे. मात्र ड्रोनच्या माध्यमातून मुंबई पोलीस मोर्चावर नजर ठेवू शकते, अशी पोलीस सूत्रांनी दिली आहे. राज्याचे राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे. शिवरायांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं जात आहे. सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून दावा केला जात आहे. फुटीरतेची बीजं इथे पेरली जात आहेत. राज्यपालांना महाराष्ट्राची अस्मिता, महत्व कमी करायचे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसत आहे. त्याविरोधात येत्या 17 तारखेला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.


महामोर्चात कोण कोण सहभागी होणार?
भायखळ्याच्या रिर्चड्सन क्रुडासपासून सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल, त्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या समोर एका ट्रकवरच सभा आयोजित करण्यात येणार आहे. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप आणि इतर नेते उपस्थित असतील. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार,सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शरद पवार सुद्धा येण्याची शक्यता आहे. डावे पक्ष सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details