मुंबई -राज्यात कोरोना नियंत्रणात येत असताना १ एप्रिल पासून मास्क मुक्ती होणार, असं बोललं जात होतं. परंतु याबाबत स्पष्टीकरण देताना राज्यात रेल्वे, बस, मॉल्स याठिकाणी शिथिलता देण्यात आली असून मास्कबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. या संबंधामध्ये सर्वस्वी हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) घेतील, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ( Rajesh Tope on Mask Free Maharashtra ) ते येथे माध्यमांशी बोलत होते.
युवकांचे लसीकरणाचे प्रमाण वाढले जाईल -जे काही निर्बंध लावले होते ते संपुष्टात आणण्याची कारवाई सरकारकडून केली जात आहे. जे काही रेल्वे, बस, मॉल अशी काही गर्दीची ठिकाणे आहेत ते नियम पाळले जातील. लसीकरण बाबत १८ वर्षाच्या पुढील वयोगटाला ९२% पहिला डोस तर दुसरा डोस ७४% लोकांना आतापर्यंत दिला गेला आहे. म्हणून अजूनही लसीकरण होणे बाकी आहे. त्याचबरोबर आपण जर का १५ ते १८ वयोगटातील युवकांचा विचार केला साधारणता हे स्कूल गोईंग स्टुडन्ट आहेत. त्यांचा २६ टक्के लसीकरण झालेल आहे. आता शाळा सुरू झालेल्या असल्याने हे प्रमाण आता वाढेल. १५ ते १८ या वयोगटात पहिला डोस ६५ टक्के व दुसरा डोस ४० टक्के झालेला आहे. पण आम्हाला ही संख्या पूर्णत्वाला न्यायची आहे.
लसीकरणाबाबत ढिलाई नको -लसीकरण बाबत जे काही टारगेट आहे ते पूर्ण करायचे आहे. म्हणून लसीकरणा बाबतीत आपण ढिलाई करू नये असे नम्र पूर्वक आव्हान मी करत आहे, असेही राजेश टोपे म्हणाले. या सर्व संदर्भामध्ये आपत्ती व्यवस्थापन माध्यमातून जे काही निर्बंध लावले जातात व केले जातात याबाबत मागण्या समाजातून येत असतात त्या मागण्या आणि मुख्यमंत्री यांच्याकडे दिल्या जातात, असे त्यांनी सांगितले.