महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लस' म्हणजे नेमके काय? जाणून घ्या हाफकीनच्या शास्त्रज्ञांकडून

चातक पक्षी जशी पावसाची वाट बघत असतो त्याप्रमाणे संपूर्ण जग कोरोनावर गुणकारी ठरणाऱ्या लसीची वाट पाहत आहे. भारतीय बनावटीच्या कोरोना लसीची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी शुक्रवारपासून(24जुलै) सुरू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत 'लस' म्हणजे नेमके काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतने केला आहे.

Experts from Halfkin Institute
हाफकीन इन्स्टिट्यूटमधील तज्ञ

By

Published : Jul 25, 2020, 6:45 PM IST

मुंबई -जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून सर्वजण गेली सहा महिने कोरोना महामारीसोबत झगडत आहेत. उपलब्ध असलेल्या औषधांचा वापर करून रुग्णांना बरे करण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत. यात त्यांना यशही येत आहे मात्र, तरीही ठोस लस उपलब्ध नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

अशा परिस्थितीत 'लस' म्हणजे नेमके काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतने केला आहे. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी केदार शिंत्रे यांनी देशातील बहुप्रतिष्ठित हाफकीन इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञांशी केलेली ही खास बातचीत....

ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी केदार शिंत्रे यांनी देशातील बहुप्रतिष्ठित हाफकीन इन्स्टिट्यूटमधील तज्ञांशी संवाद साधला

आजच्या दिवसापर्यंत वैद्यकीय विश्वात अशी खात्रीलायक कुठलीच उपचार पद्धती नाही जी कोरोनाचा समूळ नायनाट करू शकेल. जगभरातील डॉक्टर विविध औषधे वेगवेगळ्या प्रमाणात घेऊन संशोधन आणि विकासकरून त्यांचा रुग्णांवर वापर करत आहेत. काही प्रमाणात या प्रचलित असणाऱ्या औषधांना प्रतिसाद मिळत आहेत तर काहीना उपचारपद्धतीतून बाद करण्याचे संकेत नियामक संस्थांकडून देण्यात येत आहेत. अनेक औषध निर्मिती कंपन्या आणि संशोधन संस्था या आजारावरील लस शोधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. सध्या सर्वच कंपन्या लस बनवण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे दावे करत आहेत.

चातक पक्षी जशी पावसाची वाट बघत असतो त्याप्रमाणे संपूर्ण जग कोरोनावर गुणकारी ठरणाऱ्या लसीची वाट पाहत आहे. दिवसेंदिवस संपूर्ण देशात रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढत आहे. आरोग्य यंत्रणा खंबीरपणे या सगळ्या संकटात पाय रोवून उभी राहिली आहे. त्याचेच फलित म्हणजे संपूर्ण देशातून 7 लाख 24 हजार 577 रूग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत.

दरम्यान, भारतीय बनावटीच्या कोरोना लसीची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी शुक्रवारपासून(24जुलै) सुरू करण्यात आली आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स(एम्स) मध्ये ‘कोव्हॅक्सिन’ लसीची पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू झाली. एका 30 वर्षीय व्यक्तीला लसीचा पहिला डोस देण्यात आला. भारत बायोटेक, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयएमसीआर), आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांनी संयुक्तपणे या लसीचे संशोधन केले आहे. सार्स-कोव्ह-२ या विषाणूचा नमुना एनआयव्हीमधून भारत बायोटेकमध्ये आणण्यात आला होता, त्यानंतर त्यावर संशोधन करुन ही लस तयार करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details