महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai News : 5.56 किलोमीटर लांबीचा पूल मुंबईकरांसाठी बांधला जाणार, जाणून घ्या वैशिष्ट्ये

आता मुंबईकरांची ट्राफिकची समस्या काहीशा प्रमाणात दूर होणार आहे. ग्रँडरोड ते फ्री वे दरम्यान तब्बल ५.५६ किलोमीटर लांबीचा पूल मुंबईकरांसाठी बांधला जाणार आहे. ५५६० मीटर लांबीचा हा पूल प्रत्यक्षात आणण्यासाठी निविदा नुकतीच प्रकाशित झाली आहे.

By

Published : Feb 24, 2023, 1:14 PM IST

Mumbai News
5.56 किलोमीटर लांबीचा पूल मुंबईकरांसाठी बांधला जाणार

मुंबई :मुंबईमध्ये ट्राफिकची समस्या नेहमीच असते. यामुळे नागरिकांना एखाद्या नियोजित स्थळी जाण्यासाठी हमखास उशीर होतो. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने दक्षिण मुंबईतील ग्रँडरोड ते फ्री वे यादरम्यान ६४८ कोटी रुपये खर्च करून ५.६ किलोमीटरचा पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा काढल्या आहेत. यामुळे ग्रँड रोड ते फ्री वे दरम्यानचे अंतर अवघ्या सहा ते सात मिनिटात पार करता येणार असल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे.

४२ महिन्यात पूल पूर्ण होणार :मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरळीत व्हावा, यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने विविध प्रयत्न करत असते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून लवकरच तब्बल ५.५६ किलोमीटर लांबीचा पूल मुंबईकरांसाठी बांधला जाणार आहे. ५५६० मीटर लांबीचा हा पूल प्रत्यक्षात आणण्यासाठी निविदा नुकतीच प्रकाशित झाली आहे. निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाल्यापासून बांधकाम पूर्ण होण्यासाठी साधारणपणे ४२ महिन्यांचा कालावधी अंदाजित आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात आली आहे.



६ ते ७ मिनिटात फ्री वे ते ग्रँटरोड :प्रस्तावित पूल दक्षिण मुंबईतील पी. डिमेलो मार्गावरील ऑरेंज गेट नजिक सुरु होणा-या फ्री वे येथून प्रस्तावित करण्यात आला आहे. तो ग्रँटरोड स्टेशन परिसरापर्यंत असणार आहे. फ्री वे ते ग्रँटरोड स्टेशन परिसर या सुमारे ५.५६ किलोमीटर लांबीच्या अंतरासाठी सध्या ३० मिनिटे ते ५० मिनिटे एवढा कालावधी लागतो. मात्र, पुलावरून वाहतूक सुरू झाल्यावर भविष्यात हे अंतर कापण्यासाठी केवळ ६ ते ७ मिनिटे लागतील. असा विश्वास पूल विभागाने व्यक्त केला आहे. या पुलाच्या कामासाठी पालिकेने २२ फेब्रुवारी रोजी निविदा काढल्या आहेत. ४२ महिन्यात या पुलाचे काम पूर्ण होणार आहे.



या विभागांना होणार फायदा : फ्री वे ते ग्रँटरोड दरम्यानचा पूल सागरी किनारी रस्त्याला म्हणजेच कोस्टल रोडशी जोडण्यासाठीही महत्वाचा दुवा ठरणार आहे. पोर्ट ट्रस्ट क्षेत्र, डॉ. बी. आर. आंबेडकर मार्ग, पी. डिमेलो रोड, रफी अहमद किडवाई मार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग (EEH), ग्रँट रोड परिसर, ताडदेव आणि मुंबई सेंट्रल या भागातील; म्हणजेच दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक सुरळीत, अधिक सुलभ व अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

हेही वाचा :Sanjay Bhoir News: जीएसटी घोटाळ्यात माजी नगरसेवक संजय भोईर यांना अटक; ९ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details