मुंबई -रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी पतधोरण जाहीर केले. आर्थिक वर्ष 2021-22 साठी देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) ऋण ७.३ टक्के इतके राहणार असल्याची माहिती शक्तीकांत दास यांनी दिली आहे. यावर प्रतिक्रिया देतांना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपुर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल. अशी भीती व्यक्त केली आहे.
देशाचा जीडीपी हा उणे ७.५ गेला आहे. ही सत्य परिस्थिती आहे. हे याचा अर्थ रिझर्व्ह बॅंकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देताय. रिझर्व्ह बॅंकेला हे कळले पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार आहे. असा सवालही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.