महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Claim of Shrirang Berge : एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक व पीएफ ट्रस्टबाबत सरकारचे दुर्लक्ष : श्रीरंग बर्गे यांचा दावा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम करून देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले ( Neglect of ST Employees Bank and PF Trust ) होते. पण, गेले पाच महिने ही रक्कम सरकारकडून ( Governments Neglect of ST Employees Bank and PF Trust ) अपुरी येत असून, एसटी बँक तसेच भविष्य निर्वाह निधी व उपदान या दोन्ही ट्रस्टकडे त्यांचा हिस्सा भरण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या रक्कमेवरील व्याज बुडत ( The Claim of Shrirang Berge General Secretary of ST Workers ) असून, या संस्था अडचणीत सापडल्या असल्याचा दावा महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केला आहे.

By

Published : Jan 3, 2023, 9:33 PM IST

Governments Neglect of ST Employees Bank and PF Trust The Claim of Shrirang Berge
एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक व पीएफ ट्रस्टबाबत सरकारचे दुर्लक्ष : श्रीरंग बर्गे

मुंबई : एसटी कर्मचारी सभासद असलेली स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑफ बँक असून, तिचे ८७ ००० कर्मचारी सभासद ( Neglect of ST Employees Bank and PF Trust ) आहेत. या बँकेची सभासदांनी घेतलेल्या कर्ज वसुलीची १२० कोटी रुपये ( Governments Neglect of ST Employees Bank and PF Trust ) इतकी रक्कम एसटी महामंडळाने ( The Claim of Shrirang Berge General Secretary of ST Workers ) बँकेकडे भरणा केलेली नाही. बँकने मात्र ही रक्कम कर्जदार डिफॉल्टर होऊ नयेत म्हणून कर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा केली आहे. त्याचा फटका बँकेला बसत असून हीच रक्कम बँकेने व्याजाने गुंतवली असती, तर त्यावर अंदाजे सव्वा कोटी रुपये पेक्षा जास्त व्याज मिळाले असते.

रिझर्व्ह बँकेनेसुद्धा वारंवार आक्षेप नोंदवलामात्र ते पैसे बुडाले असून त्याचा फटका बँकेला बसला आहे. त्यामुळे बँक अडचणीत सापडली आहे. या प्रकाराबद्दल रिझर्व्ह बँकेनेसुद्धा वारंवार आक्षेप नोंदवला आहे. बँक तांत्रिकदृष्ट्या अडचणीत सापडली आहे. याशिवाय भविष्य निर्वाह निधी व उपदान या दोन्ही रक्कमांचा एसटी कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र ट्रस्ट असून यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेल्या रक्कमेचा हिस्सा या ट्रस्टकडे भरणा केला जातो. तो हिस्सासुद्धा गेले पाच महिने भरणा केला नसून ही रक्कम अंदाजे ६५० कोटी रुपये इतकी आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक व पीएफ ट्रस्टबाबत सरकारचे दुर्लक्ष : श्रीरंग बर्गे

दोन्ही ट्रस्टसुद्धा अडचणीत सापडल्याही रक्कम ट्रस्टकडे भरणा न झाल्याने गुंतवणुकी नंतर त्यावर मिळणारे अंदाजे बरा ते पंधरा कोटी रुपये इतके व्याज ट्रस्टला मिळालेले नाही. त्यामुळे या दोन्ही ट्रस्टसुद्धा अडचणीत सापडल्या असून या संस्थासुद्धा गोत्यात आल्या आहेत. याप्रकरणी एसटी राज्य कर्मचारी काँग्रेस नेते सविस्तरपणे म्हणाले, "एसटी बँक व दोन्ही ट्रस्ट ह्या संस्था कर्मचाऱ्यांच्या असून त्या अडचणीत सापडल्याने कर्मचाऱ्यांचेसुद्धा नुकसान होत आहे. या व्यतिरिक्त एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्था, ग्राहक भांडार या संस्थांसुद्धा अनेक जिल्ह्यांत असून, त्याचेही कोट्यवधी रुपयांचे देणे बाकी आहे.

त्यामुळे या संस्थासुद्धा अडचणीत सापडल्या आहेत. या सर्व प्रकाराला नवे सरकार जबाबदार आहे. नवे सरकार न्यायालयात दिलेला शब्द पाळीत नसून कर्मचाऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोपसुद्धा बरगे यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details