महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकांपूर्वी सरकारचा कार्यक्रमांचा धडाका

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे

mumbai

By

Published : Feb 13, 2019, 10:50 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. कृषी पुरस्कार वितरणाची पुण्यात लगीनघाई सुरू असताना आजच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
या पुरस्कारासाठी १ कोटी ५ लाखाचा निधी वितरीत केला असून कृषी पुरस्कारांसाठी दीड कोटीचा निधी वितरीत केला आहे. विशेष म्हणजे २ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कृषी पुरस्कारांची घोषणा झाली. १४ फेब्रुवारीला राज्यपालांचे हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्यातील बालेवाडी छत्रपती शिवाजी क्रिडा संकुलात जय्यत तयारीचे आदेश दिले आहे. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी गेटवे इंडिया वर जोरदार तयारी सुरू आहे.
चंद्रशेखर भडसावळे आणी शिवनाथ बोरसे हे कृषीरत्न पुरस्कारांचे मानकरी आहेत. राज्यात कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दिल्या जाणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांची राज्य सरकारने तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर घोषणा केली. २०१५ आणि २०१६ या २ वर्षातील हे कृषी पुरस्कार राज्य सरकारने जाहीर केले आहेत. दरवर्षी राज्य शासनाच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, कृषीभूषण (सेंद्रीय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे-पाटील, कृषि सेवारत्न आदी कृषी पुरस्कार दिले जातात.

ABOUT THE AUTHOR

...view details