मुंबई - कोस्टल रोडच्या विरोधासाठी वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी काही दिवसांपूर्वी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. आज दक्षिण मुंबई मतदारसंघातील वरळी कोळीवाड्यात अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बाईक रॅली काढण्यात आली. तेव्हा मोठ्याप्रमाणात कोळी बांधव रॅलीमध्ये नाचताना दिसले. त्यावरून खरेच कोळी बांधव बहिष्कार टाकणार आहेत की हुलकावणी देत आहेत हा प्रश्न उपस्थित होत आहे.
वरळी कोळीवाड्याच्या विकासाचा मुद्दा ऐरणीवर; तरीही प्रचारात शिवसेनेला चांगला प्रतिसाद
शिवसेनेचे वर्चस्व असणाऱ्या वरळी कोळीवाड्यात उमेदवार अरविंद सावंत यांना फटका बसेल असे म्हटलं जात होते. मात्र, कोळीवाड्यांच्या विकासाचा मुद्दा ऐरणीवर असतानाही, प्रचारात शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शिवसेनेचे वर्चस्व असणाऱ्या वरळी कोळीवाड्यात उमेदवार अरविंद सावंत यांना फटका बसेल असे म्हटलं जात होते. मात्र, कोळीवाड्यांच्या विकासाचा मुद्दा ऐरणीवर असतानाही, प्रचारात शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'कोस्टल रोडसाठी सध्या मुंबई उच्च न्यायालयायने स्टे ऑर्डर दिली आहे. तरी आजपर्यंत कोणत्याही पक्षाने या कामामुळे वरळी मच्छिमारांचे होणारे नुकसान लक्षात घेतलेले नाही. कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही, असे सांगत वरळी कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता.
त्यात आजची वरळी कोळीवाड्यातील प्रचार रॅलीमध्ये नाचणारे कोळी बांधव बघून खरेच कोळी बांधव दुःखी आहेत की नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे. मागच्या वेळी सिलिंक सारखा प्रकल्प होत असताना कोळी बांधवांचा असाच विरोध होता. परंतू कालांतराने तो नाहीसा झाला व ते पुन्हा निष्ठा असलेल्या शिवसेनेला पाठिंबा देऊ लागले. असेच काहीसे आता ही होईल का ? हे येणाऱ्या निवडणूकीपर्यंत पाहणे औचित्याचे ठरेल.