मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १२ नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळेच मुख्यमंत्री कार्यालयासह सर्व मंत्र्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे सर्वांनी आपआपले कार्यालय आज (१३ नोव्हेंबर) सायंकाळी साडेपाचपर्यंत रिकामे करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने सर्व मंत्री आणि राज्यमंत्री कार्यलयांना दिले होते. त्यानुसार कार्यालये रिकामी केली जात आहेत.
देवेंद्र फडणवीसांसह सर्व मंत्र्यांना मंत्रालयातील दालने खाली करण्याचे आदेश
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे कार्यालयातील सर्व फाईल मूळ विभागाकडे हस्तांतरीत करावी, असा आदेश दिला होता. तसेच कार्यालयात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचार्यांनाही मूळ विभागात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे कार्यालयातील सर्व फाईल मूळ विभागाकडे हस्तांतरीत करावी, असा आदेश दिला होता. तसेच कार्यालयात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचार्यांनाही मूळ विभागात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्र्याच्या सर्व मंत्र्यांची सविस्तर माहिती पाठवण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. विशेष म्हणजे या सर्व कार्याची कार्यवाही पूर्ण करून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे द्यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात मंत्रालयाच्या सर्व दालनांमध्ये नाराजीची भावना कर्मचाऱ्यांच्या चेहर्यावर दिसत आहेत. जड अंतकरणाने ते कार्यालय सोडत असल्याचे चित्र दिवसभर आज मंत्रालयांमध्ये दिसत होते.