मुंबई - शहरातील माहीम, बांद्रा परिसरात दिवसा घरफोडी करणाऱ्या तीन अट्टल दरोडेखोरांना मुंबई पोलिसांच्या मालमत्ता शाखेने अटक केली आहे. मुंबईतील वेगवेगळ्या परिसरामध्ये सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक नसलेल्या सोसायट्यांमध्ये हा आरोपी सेल्समन म्हणून जाऊन रेकी करत. पोलिसांनी अटक केलेल्या ज्ञानेश्वर अप्पदुराई शेट्टी या आरोपीवर घरफोडी आणि फसवणुकीचे तब्बल 35 गुन्हे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
सेल्समन बनून घरफोडी करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला बेड्या
मुंबईतील वेगवेगळ्या परिसरामध्ये सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक नसलेल्या सोसायट्यांमध्ये हा आरोपी सेल्समन म्हणून जाऊन रेकी करत. पोलिसांनी अटक केलेल्या ज्ञानेश्वर अप्पदुराई शेट्टी या आरोपीवर घरफोडी आणि फसवणुकीचे तब्बल 35 गुन्हे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
हेही वाचा - पत्नीने नोकरी करू नये म्हणून मारहाण करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी याप्रकरणी न्यानेश्वर आप्पा दुराई शेट्टी (35), मोहन आर मुकाम शेट्टी( 27), अलोकनाथ आर्मी गम शेट्टी(23) या अट्टल दरोडेखोरांना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी हे बांद्रा, शिवाजी पार्क आणि माहीम परिसरामध्ये सीसीटीव्ही नसलेल्या सोसायट्यांमध्ये सेल्समन असल्याचे सांगून जात होते. या दरम्यान पूर्ण सोसायटीची रेकी केल्यानंतर कटावणीच्या साह्याने घराचा दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केल्यानंतर सोन्या चांदीचे दागिने लुटत होते. चोरलेले दागिने हे मुंबईबाहेर नेऊन सोनाराकडे वितळवून त्यातून येणारा पैसा त्यांच्या गावी इतर कामात खर्च करीत होते. अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींवर चोरी, विनयभंग, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आलेले आहेत.