मुंबई-मुंबईत पेट्रोलच्या दराने शनिवारी शंभरी पार केली. मुंबईत पेट्रोल १०० रुपये २३ पैसे, तर डिझेल ९२ रुपये १७ पैसे झाले आहे. पेट्रोल दर लिटरमागे २६ पैसे, तर डिझेल दर २८ पैसै वाढ करण्यात आल्याचे सरकारी इंधन कंपन्यांनी जाहीर केले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात परभणीतील पेट्रोलचे दर आधीच शंभरीपार गेले होते. आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलदर शंभरीपार गेले आहेत. पेट्रोलचे दर मुंबईत १०० रुपये १९ पैसे झाले असून डिझेलचे दर ९२ रुपये १७ पैसे झाले आहेत.
इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका -
वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचा भाव हा 90 रुपयांवर पोहोचला आहे. देशात पेट्रोल -डिझेलच्या किंमतीचा उच्चांक गाठला आहे. मे महिन्यात आतापर्यंत एकूण 16 दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे 4 मे पासून इंधनाच्या दरात वाढ सुरु झाली. मे महिन्यात पेट्रोलचा दर हा 3.59 रुपये प्रतिलीटरने तर डिझेलचा दर हा 4.13 रुपये प्रतिलिटरने वाढला आहे.