महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आयपीएल बेटिंगप्रकरणी माजी रणजी खेळाडूला अटक

रॉबिन मॉरिस या माजी रणजी खेळाडूला पोलिसांनी अटक केली आहे.

आयपीएल बेटिंगप्रकरणी माजी रणजी खेळाडूला अटक
आयपीएल बेटिंगप्रकरणी माजी रणजी खेळाडूला अटक

By

Published : Nov 9, 2020, 10:27 AM IST

Updated : Nov 9, 2020, 11:22 AM IST

मुंबई- दुबई येथे सुरू असलेल्या आयपीएल सामन्यादरम्यान बेटिंग घेणाऱ्या माजी रणजीपटूला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. वर्सोवा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी रॉबिन मॉरिस या माजी रणजी खेळाडूला पोलिसांनी अटक केली आहे. 44 वर्षांचा हा खेळाडू 42 प्रथम श्रेणी सामने खेळला असून 1995 ते 2007 या दरम्यान आरोपी रॉबिन मॉरिस यांनी मुंबई व ओडिशा क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेले आहे. रॉबिनसह त्याच्या इतर २ सहकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यावर बेटिंग लावल्याची माहिती आहे. रॉबिनच्या घरातून २ लॅपटॉप, ३ टॅबलेट्ससह १४ मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत.

घरातच घेत होता आयपीएलवर बेटिंग -

वर्सोवा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून, मुंबईतील अंधेरी यारी रोड परिसरातील रॉबिन मॉरिस याच्या घरी बेटिंग घेतली जात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाड मारली असता त्या ठिकाणी रॉबिन मॉरिस हा आणखी दोन आरोपींसह आयपीएल सामन्यांवर बेटिंग घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी काही मोबाईल फोन, लॅपटॉप जप्त केले असून न्यायालयामध्ये या आरोपींना हजर केले असता त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

आयपीएल बेटिंगप्रकरणी माजी रणजी खेळाडूला अटक

या अगोदरही अपहरणाच्या गुन्ह्यात झाली होती अटक -

माजी रणजी खेळाडू रॉबिन मॉरिसला या अगोदरही 2019 मध्ये एका रिकव्हरी एजंटच्या अपहरणप्रकरणी अटक करण्यात आली होती. रॉबिन मॉरिसने पर्सनल लोनसाठी अर्ज केल्यानंतर यासाठी 'प्रोसेसिंग फी' च्या नावाखाली मोठी रक्कम शाम तलरेजा या एजंटला दिली होती. मात्र, लोन पास न झाल्यामुळे एजंट दिलेले पैसे परत देत नसल्यामुळे त्याने शाम तलरेजा याचे अपहरण केले होते.

Last Updated : Nov 9, 2020, 11:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details