महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: घानाचा फुटबॉलर रॅन्डी जुआन म्युलर अखेर मायदेशी परतणार

लॉकडाऊनमुळे गेले 5 महिने भारतात अडकलेला घानाचा फुटबॉलर रॅन्डी जुआन म्युलर त्याच्या मायदेशी परतत आहे.आता घरी जात असल्याचा आनंद होतोय. माझ्यापेक्षा माझ्या आईला सर्वात जास्त मी सुखरूप परतण्याचा आनंद होत आहे, असे रॅन्डी जुआन म्युलर याने म्हटले. भारतातून घरी गेल्यावर इथले जेवण विशेषतः नाश्तातील इडली आठवेल. भारतीय नागरिक खूप प्रेमळ व मदत करणारे आहेत, अशी भावना देखील रॅन्डी म्युलरने भारतीयांबद्दल व्यक्त केली.

randy juan mulle
रॅन्डी जुआन म्युलर

By

Published : Aug 16, 2020, 12:14 AM IST

Updated : Aug 16, 2020, 1:39 AM IST

मुंबई- लॉकडाऊनमुळे गेले 5 महिने भारतात अडकलेला घानाचा 23 वर्षीय फुटबॉलर रॅन्डी जुआन म्युलर अखेर मायदेशी परतणार आहे. तो घानाला परतण्यापूर्वी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी जया पेडणेकर यांनी रॅन्डी जुआन म्युलरशी खास बातचीत केली आहे.

ईटीव्ही भारत विशेष: घानाचा फुटबॉलर रॅन्डी जुआन म्युलर अखेर मायदेशी परतणार

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द केल्यावर 74 दिवस रॅन्डी जुआन म्युलरने मुंबई विमानतळावर घालवले. विमानतळावर राहूनही खेळायची संधी मिळाल्यास भारतातच राहण्याची इच्छादेखील रॅन्डी जुआन म्युलरने ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली होती. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळ खेळले जात नसल्यामुळे रॅन्डी म्युलरला 5 महिन्यानंतर आपल्या मायदेशी परतावे लागत आहे.

आता घरी जात असल्याचा आनंद होतोय. माझ्यापेक्षा माझ्या आईला सर्वात जास्त मी सुखरूप परतण्याचा आनंद होत आहे, असे रॅन्डी जुआन म्युलर याने म्हटले. भारतातून घरी गेल्यावर इथले जेवण विशेषतः नाश्तातील इडली आठवेल. भारतीय नागरिक खूप प्रेमळ व मदत करणारे आहेत, अशी भावना देखील रॅन्डी म्युलरने भारतीयांबद्दल व्यक्त केली.

74 दिवस विमानतळावर घालवल्यावर युवा सेना कार्यकारिणी सदस्य राहुल कनल व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेत म्युलरची राहण्याची सोय वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये केली होती. जवळपास अडीच महिने येथे युवासेनेच्या वतीने देखभाल करण्यात आली. तसेच त्याची परतण्यासाठीची संपूर्ण जबाबदारी देखील राहुल कनल यांनी घेतली. त्यामुळे राहुल कनल व आदित्य ठाकरे यांचे म्युलरने ईटीव्ही भारतशी संवाद साधताना विशेष आभार मानलेत.

मायदेशी परतण्यासाठी राहुल सोबतच घानाचे दूतावास अधिकारी नेहमी संपर्कात होते, त्यांची मदत झाल्याचे म्युलरने सांगितले. भविष्यात कोरोनानंतर परिस्थिती स्थिर झाल्यास भारतात पुन्हा फुटबॉल खेळण्याची इच्छा देखील त्याने व्यक्त केली.

Last Updated : Aug 16, 2020, 1:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details