मुंबई- सायन स्टेशनजवळील एलबीएस रस्त्याच्या डाव्याबाजूला असलेल्या फुटपाथवरून जाणाऱ्या वायरींना रात्री अचानक आग लागली. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणार्या वाहनचालकांमध्ये व शेजारी राहणाऱया लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या परिसरात नेहमी वर्दळ असते
सायनमध्ये फुटपाथवरील उघड्या वायर्सना आग; जीवितहानी नाही
यावेळी या परिसरात पाऊस पडत नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. पालिका कर्मचारी थोड्या वेळातच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे दुरूस्तीचे कामही तात्काळ पूर्ण झाले आहे.
आग लागल्यानंतर स्थानिकांनी बेस्ट व अग्निशमन दलाशी संपर्क साधला. यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल व बेस्टच्या कर्मचाऱयांनी येऊन विद्युत पुरवठा थांबवत आगीवर नियंत्रण मिळवले. यात मात्र रस्त्यावरून ये-जा करणाऱया नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागला.
यावेळी या परिसरात पाऊस पडत नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. पालिका कर्मचारी थोड्या वेळातच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे दुरूस्तीचे कामही तात्काळ पूर्ण झाले आहे. काहीकाळ पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत केल्यामुळे रस्ता अंधारमय झाला होता.