मुंबई- कोरोना प्रादूर्भावाच्या स्तिथीत राज्यातील रिक्त पदे, याचा फायदा घेत काही समाजकंटक पद भरतीच्या खोट्या जाहिराती प्रसिद्ध करत असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास विभागाने दिली आहे.
ग्रामविकास विभागातील पदभरतीची जाहिरात खोटी, संबंधितावर गुन्हा दाखल होणार
राज्यस्तरीय सरळसेवा निवड समिती अशा प्रकारची कोणतीही समिती ग्रामविकास विभागाच्या अधिन कार्यरत नाही. प्रकल्प व्यवस्थापक, ई-ग्रामपंचायत असे कोणतेही पद अस्तित्वात नाही.
विविध पदांच्या पदभरतीसाठी https://www.egrampanchayat.com या संकेतस्थळावर खोटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे कोणतीही पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही. राज्यस्तरीय सरळसेवा निवड समिती अशा प्रकारची कोणतीही समिती ग्रामविकास विभागाच्या अधिन कार्यरत नाही. प्रकल्प व्यवस्थापक, ई-ग्रामपंचायत असे कोणतेही पद अस्तित्वात नाही. ही जाहिरात पूर्णत: खोटीअसल्याचे ग्रामविकास विभागाने म्हटले आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची दिशाभूल करुन मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे . या खोट्या जाहिरातीस कोणीही बळी पडू नये, असे आवाहन ही ग्रामविकास विभागाचे केले आहे.