मुंबई -आता मला सरकारच सगळंच चांगलं वाटू लागलंय, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी शहरात आयोजित उद्योग परिषदेत केले. यापुढे सेना-भाजपतील वाद महाराष्ट्राच्या विकासाआड येणार नाहीत असेही ते यावेळी म्हणाले.
आता लोकसभा निवडणुका आहेत आणि त्यानंतर विधानसभा या दोन्ही निवडणुका आपणच जिंकणार आहोत. आमची युती घट्ट असल्याचीही ग्वाही ठाकरेंनी यावेळी दिली. महाराष्ट्राचे उद्योग धोरण जाहीर करण्यासाठी आयोजित परीषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सहभागी झाले होते, त्यावेळी ते म्हणाले.
राज्यातील उद्योगांची जगात दखल घेतली जाते. आमचे सहकारी सुभाष देसाई यांनी सक्षमपणे उद्योग विभागच संचलन केले आहे. गेल्या साडेचार वर्षात उद्योग विभागाने खूप चांगल काम केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात म्हणाले.
आज महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरणाची पुस्तिका आज आपण प्रकाशित केली. या निमित्ताने उद्धव यांना मी सांगू इच्छितो, आम्ही सरकार मध्ये चांगले उद्योग निर्मीत केले आहेत. मागील साडेचार वर्षात उद्योगामध्ये महाराष्ट्र आज देशात पहिल्या क्रमांकावर आहे. उद्योग धोरण शाश्वत असायला हवे. त्यासाठी आम्ही आणखी सुधारणा करु. कारण, राज्याच्या सर्वांगीण विकासाची दिशा उद्योग धोरणात आहे, असे ते यावेळी म्हणाले.