महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित डोळ्यांची तपासणी अन् मार्गदर्शन शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

मुंबई महानगरपालिका वॉर्ड क्रमांक १५० या वॉर्डमध्ये बुद्धपौर्णिमेनिमित्त डोळ्यांची तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित डोळ्यांची तपासणी अन् मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

By

Published : May 19, 2019, 9:56 AM IST

मुंबई- बुद्धपौर्णिमेनिमित्त चेंबूर येथे आयोजित आय चिकित्सा व मार्गदर्शन शिबिराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. चेंबूर येथील पी. एल. लोखंडे मार्गवरील मालेकर वाडी रहिवासी संघ व आदित्य ज्योत आय हॉस्पिटल, वडाळातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डोळ्यांच्या आजाराने त्रस्त असलेल्या नागरिक व गरीब रुग्णांसाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित डोळ्यांची तपासणी अन् मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

मुंबई महानगरपालिका वॉर्ड क्रमांक १५० च्या नगरसेविका संगीता हंडोरे व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे या विभागात, अशा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजित करत असतात. बुद्धपौर्णिमेनिमित्त वडाळा आय हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात आले. त्यात काही रुग्ण मोती बिंदू, डोळ्यांना कमी दिसणे, डोळ्यांची अॅलर्जी असलेले रुग्ण या शिबिरात आढळून आले आहेत. त्यांच्या आजारावर आदित्य ज्योत आय हॉस्पिटल, वडाळा पुढील उपचारासाठी सहकार्य करणार आहे.

यावेळी आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे डॉक्टर विजय यादव म्हणाले, गरीब रुग्ण डोळ्याच्या आजाराकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांचे डोळ्याचे आजार वाढतात. त्यामुळे त्यांनी वेळीच उपचार घ्यावा, हा या शिबिरामागचा उद्देश आहे. आज आमच्याकडे तपासणीसाठी २१ रुग्ण आले आहेत. त्यात ३ ते ४ रुग्णांना मोतीबिंदू आहे. काहींना रेटिनाचे आजार आहे. हे शिबिर झाल्यानंतर आम्ही त्यांच्या पुढील तपासणीसाठी पाठपुरावा करतो व कमीतकमी दरात त्यांच्यावर उपचार करतो. एखाद्या रूग्णावर जर खर्चिक शस्त्रक्रिया करायची असेल तर आमच्या एक ट्रस्टच्या मदतीने आम्ही ती करून देतो.

ABOUT THE AUTHOR

...view details