टोकयो - ऑलिम्पिकमध्ये भारताला अखेर सुवर्णपदक मिळाले आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने ट्रॅक अँड फील्डमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. या कामगिरीनंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नीरजबाबत हटके ट्वीट केले आहे. महिंद्रा यांनी नीरजला बाहुबलीची उपमा देत, आम्ही सगळे तुझ्या सैन्यात आहोत, असे ट्वीट केले आहे.
BREAKING : बाहुबली, आम्ही सगळे तुझ्या आर्मीत आहोत....नीरज चोप्राबाबत उद्योगपती आनंद महिंद्रांचं हटके ट्वीट
18:42 August 07
नीरज चोप्राबाबत उद्योगपती आनंद महिंद्रांचं हटके ट्वीट
17:27 August 07
आईकडे वाईट नजरेने बघत असल्याच्या कारणाने मुलाकडून वडिलांची हत्या
अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटपूर या गावात पोटच्या मुलाने आपल्या वडिलांची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी मुलाने मृताची ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचला होता. दरम्यान, शिरखेड पोलिसांनी आरोपी मुलाला चार तासातच अटक करून हत्येचा छडा लावला आहे. रमेश माणिकराव अकोटकर असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे.
15:10 August 07
देशाला सतत आगे बढो म्हणणारा कंडक्टरसारखा पंतप्रधान हवा; मुख्यमंत्री ठाकरेंचा मोदींना टोला
मुंबई - बसमधील कंडक्टर प्रवाशांना सारखा आगे बढो आगे बढो सांगत असतो. असेच आगे बढो आगे बढो म्हणत देशाला पुढे नेणारा पंतप्रधान पाहिजे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावला आहे. यावेळी परिस्थिती बघून लोकल ट्रेन व हॉटेल सुरु करण्याबाबत निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले.
14:05 August 07
जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लस :
भारतात कोरोनावरील जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या सिंगल डोसच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केली.
13:48 August 07
फेक फोन प्रकरण :
मुंबईत बॉम्ब ठेवल्याच्या फेक फोन प्रकरणी ज्या दोन जणांना अटक करण्यात आली ते दोघेही जालनाचे रहिवाशी आहेत. त्यांना ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी ठाण्यातून फोन केला. गम्मत म्हणून फोन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आली.
13:03 August 07
बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
कार्यक्रमात काय म्हणाले मुख्यमंत्री?
- देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो आगे बढो
- बेस्टचा प्रवास नक्कीच अभिमानास्पद आहे
- 1874ची बेस्ट ही घोडागाडीच होती
- कालानुरूप आता बदल होत गेले
- मां आणि बाळासाहेब आम्हाला ट्राममधून फिरायला न्यायचे, अजूनही पुसटशा आठवणी ट्रामच्या अजूनही आहेत
- मी शाळेत बेस्ट बसमधून जात होतो
- 1969साली माहीम बस डेपोजवळ सीमा आंदोलनची सुरुवात झाली होती
- ती एक आठवण या बस डेपोची आहे
- तुमच्या सहकार्यामुळे बेस्टचे आधुनिकीकरण होत आहे
- कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने-आण तुम्ही केली आहेत
- जनतेची सेवा करण्याचे काम बेस्ट कर्मचारी करत आहेत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
13:00 August 07
मुंबईत बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन :
मुंबई -काल (शुक्रवारी) मुंबईत चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन पोलिसांना आला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या इंटेलिजन्स युनिटने दोन जणांना ताब्यात घेतले आहे. एका पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. यात त्याने असे म्हटले होते की, सीएसएमटी, भायखळा ठाणे, दादर ठाणे आणि बीग बी अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवला असे सांगितले होते. तो निनाव फोन असल्याचे मुंबई पोलिसांच्या लक्षात आले. हा फोन कुणी केला आणि कुठून केला, याबाबत शोध मुंबई पोलीस घेत आहे.
12:57 August 07
राज कुंद्रा जामीन याचिका :
मुंबई -उद्योजक आणि अभिनेते शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्राच्या सत्र न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्जावरील आदेश आज (शनिवारी) सुनावला जाणार नाही. संबंधित न्यायाधीशांच्या अनुपलब्धतेमुळे आज त्यावर सुनावणी होणार नाही.
12:49 August 07
बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन :
मुंबई -बेस्टच्या इलेक्ट्रिक बस आणि माहीम बस स्थानकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. टाटा कंपनीच्या इलेक्ट्रिक बसेस मुंबईत धावणार आहेत. याआधी मिनी बसेस धावत होत्या. आता मोठ्या बसेसही ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
12:45 August 07
सहायक पोलीस निरीक्षकची रिक्षाचालकाला मारहाण :
औरंगाबाद - सहायक पोलीस निरीक्षक राजेश मायेकरची रिक्षाचालकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. कारला धक्का लागला म्हणून रिक्षा चालकाची चावी काढून घेतली. रिक्षाचालक चावी देण्याची हात जोडून विनंती करत असतानाही राजेश मायेकर यांनी मारहाण केली. मारहाणीचा आणि पोलिसाच्या दादागिरीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. गुंडालाही शोभणार नाही अशा भाषेत पोलीस निरीक्षकाने शिवीगाळ केली. भर रस्त्यात पोलीस निरिक्षकाकडून रिक्षा चालकावर दादागिरी केल्याचा हा प्रकार समोर आल्यामुळे औरंगाबाद पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
12:43 August 07
मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात गॅस लिकेज :
मुंबई -मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात गॅस लिकेज झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कोरोना रुग्णांना इतर वॉर्डमध्ये हलवले आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. तर वेळीच रुग्णांना हलवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
11:21 August 07
सत्र न्यायालयातील कुंद्रा याच्या जामिन अर्जावर आज सुनावणी होणार नाही
मुंबई: उद्योजक आणि अभिनेते शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्राचा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज संबंधित न्यायाधीशांच्या अनुपलब्धतेमुळे आज सुनावणी होणार नाही. कुंद्रा यांनी महाराष्ट्र सायबरच्या पोर्नोग्राफी प्रकरणात ही याचिका दाखल केली आहे.
10:49 August 07
पोर्नोग्राफी प्रकरण :
पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या उद्योगपती राज कुंद्रा आणि रायन थोरपे याचिका फेटाळण्यात आली आहे. राज कुंद्राने मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते तसेच त्वरीत सुटका करावी, अशी मागणी केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली.
10:49 August 07
टोकियो ऑलिम्पिक :
गोल्फर अदिती अशोक चौथ्या क्रमांकावर; पदक हुकलं
07:57 August 07
पॉर्नोग्राफी प्रकरण :
व्हिडीओ कंटेन्ट संदर्भात शर्लिनला प्रश्न -
शर्लिन चोप्रा सकाळी साडे अकरा ते बाराच्या सुमारास प्रॉपर्टी सेलमध्ये पोहोचली. शर्लिन चोप्रा हिला आर्म्स प्राईमसोबत असणाऱ्या संबंधित संदर्भात विचारण्यात आले. त्याचे नियम व अटी शर्ती काय आहेत? यासंदर्भात विचारण्यात आले. तसेच तुम्ही किती व्हिडिओ शूट केले आहेत. त्याच्याकडे प्रॉडक्शनचे भागीदार कोण आहेत? याबाबतही शर्लिनला विचारणा करण्यात आली.
06:47 August 07
पॉर्नोग्राफी प्रकरण : शर्लिन चोप्राची आठ तास चौकशी
मुंबई -पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्राची मुंबई पोलिसांकडून तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. शुक्रवारी रात्री चौकशीनंतर तिला सोडण्यात आले. तर गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याचीही शक्यता आहे. उद्योगपती राज कुंद्रा प्रकरणात शर्लिन चोप्रा हिचेदेखील काही लिंक लागत असल्यामुळे मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने तिची तब्बल आठ तास चौकशी केली. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा अटकेत आहेत.
06:22 August 07
BIG BREAKING
नाशिक - नाशिकमध्ये 30 जणांना डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली आहे. त्यातील 28 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. त्यांना डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्यानंतर त्यांचे नमुने पुणे येथे जिनोम सिक्वेंसिंग येथे पाठवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीनिवास यांनी दिली.