मुंबई - आदिवासी भागातील मुलांमध्ये शिक्षणाची प्रचंड ऊर्जा आहे. ते अनेक प्रश्न विचारून शिक्षकांना भंडावून सोडत असतात. त्यांना पर्यावरणाचे धडे उपजतच मिळाले आहेत. मात्र, शिक्षकांनी आणखी धडे देण्याची गरज असल्याचे मत वनरक्षक तसेच शिकार विरोधी दलाच्या सद्स्य लक्ष्मी मरावी यांनी व्यक्त केले.
कान्हा राष्ट्रीय उद्यानाच्या वनरक्षक लक्ष्मी मरावी लक्ष्मी मध्यप्रदेशातील आदिवासी मुलांना शिक्षणाची निर्माण व्हावी यासाठी काम करीत असतात. त्यासाठी सेंच्युरी नेचर फाऊंडेशन या संस्थेकडून दिला जाणारा यंदाचा 'युवा निसर्ग संवर्धन पुरस्कार' लक्ष्मी मडावी यांना देण्यात आला. त्यानिमित्ताने ईटीव्ही भारतने आज त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी आदिवासी भागातील समस्यांवर प्रकाश टाकला.
कान्हा राष्ट्रीय उद्यान आणि जवळ असलेल्या जंगलातील आदिवासी पट्ट्यांमध्ये लक्ष्मी यांनी पर्यावरणीय शिक्षक म्हणून आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. आदिवासी मुलांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले. त्या प्रयोगाची दखल सेंच्युरी नेचर फाऊंडेशन या संघटनेने घेतली. त्यांना यंदाचा 'युवा निसर्ग संवर्धन पुरस्कार' देण्यात आला.
आदिवासी भागांमध्ये पर्यावरण संरक्षण आणि लहान मुलांच्या शिक्षणासंदर्भात सुरू असलेल्या चळवळी कायम कार्यरत राहायला पाहिजे. अनेकदा त्यांच्या विकासाच्या संदर्भात पुन्हा-पुन्हा विषय येतात. ते विषयी थोडेसे वेगळ्या पद्धतीने हाताळून ही चळवळ पुढे चालली पाहिजे. आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाची प्रचंड आवड आहे. तितकीच त्यांना शिकायची इच्छा पण आहे. मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सोयी सुविधा मिळत नसतात. त्यांच्यासाठी असलेल्या शिक्षकांना देखील पर्यावरण संरक्षणाचे धडे द्यायला पाहिजे, असे लक्ष्मी म्हणाल्या.