मुंबई- सरकार निर्णय घेत असते. मात्र, त्या निर्णयांची अंमलबजावणीच केली जात नाही. कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती सरकारच्या काळात झाले आहेत, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला.
कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती सरकारच्या काळात; खडसेंचा सरकारला घरचा आहेर
प्रश्नोत्तराच्या तपासादरम्यान खडसेंनी आदिवासी विद्यार्थी, पहारेकऱ्यांचे वेतन आणि कुपोषणाचे मुद्दे उपस्थित केले. यावरून त्यांनी भाजप सरकारवरच निशाणा साधला
प्रश्नोत्तराच्या तपासादरम्यान खडसेंनी आदिवासी विद्यार्थी, पहारेकऱ्यांचे वेतन आणि कुपोषणाचे मुद्दे उपस्थित केले. यावरून त्यांनी भाजप सरकारवरच निशाणा साधला. त्यानंतर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग १० दिवसात लागू करणार असल्याचे सांगितले.
विदर्भातील अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, वर्धा आदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी योजना राबवताना १०३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. त्यामुळे तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांच्या निलंबनाची घोषणा पणन व वस्त्रोद्योगमंत्री राम शिंदे यांनी केली.