महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 26, 2022, 11:27 AM IST

ETV Bharat / state

ED Approach Court : नंदकिशोर चतुर्वेदी विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट मागण्यासाठी ईडी न्यायालयात

पुष्पक बुलियन प्रकरणात (Pushpak Bullion Case) हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी (hawala operator nandkishore chaturvedi) विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट मागण्यासाठी ईडी न्यायालयात जाणार आहे. चतुर्वेदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) यांच्या कंपनीचे ३० कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. चतुर्वेदी हा सध्या फरार आहे. तो देश सोडून पळून गेल्याची माहिती तपासयंत्रणांना मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

ED
ईडी

मुंबई:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची 6 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील महत्त्वाचा सूत्रधार नंदकिशोर चतुर्वेदी ( Nandkishor Chaturvedi ) हा फरार झाला आहे. त्याने देशातून पळ काढल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाल्याचे सांगितले जात आहे. ईडी चतुर्वेदीच्या मागावर आहे. तसेच, कारवाईच्या भीतीने तो भारत सोडून पसार झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नंदकिशोर चतुर्वेदी हा देश आणि मुंबई सोडून परदेशात गेल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीच्या कारवाईनंतर चतुर्वेदी हा रडारवर आला आहे. गेल्या 9 महिन्यांपासून ईडी चतुर्वेदीच्या मागावर होती. या व्यक्तीच्या नावावर अनेक शेल कंपन्या आहेत. शेल कंपन्यांमार्फत हवाला पैसा जमा करण्याचे काम याच्याकडेच आहे. विशेष म्हणजे, चतुर्वेदी हा पेशाने सीए आहे. तो हवाला ऑपरेटर असून त्याचे ठाकरे परिवाराशी अत्यंत जवळचे संबंध असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details