मुंबई: मध्य रेल्वेवरील कर्नाक पूल शनिवार रात्रीपासून तोडण्यास सुरुवात करण्यात आली. या दरम्यान मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. रेल्वे सेवा बंद असताना बेस्टकडून अधिक बसेस सोडण्यात आले होते. याचा फायदा बेस्टला झाला आहे. मेगाब्लॉक दरम्यान बसमधून ४९ हजार प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून बेस्टला ३ लाख १७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
बेस्टला फायदा:सीएसएमटी ते मस्जिद बंदर दरम्यानच्या ब्रिटिशकालीन धोकादायक कर्नाक पुलाच्या तोडकामासाठी मध्य रेल्वेने १९ नोव्हेंबर रात्री ११ ते सोमवार मध्यरात्री २ वाजेपर्यंत २७ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. या मेगाब्लॉक दरम्यान सीएसटी ते भायखळा, वडाळा येथील ट्रेन बंद ठेवण्यात आले होते. यामुळे बेस्ट उपक्रमाने जादा बसेस सोडल्या होत्या.
बेस्टमधून प्रवास करणे पसंद: मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे सेवा बंद असल्याने नागरिकांनी आणि प्रवाशांनी दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्टमधून प्रवास करणे पसंद केले आहे. बेस्टने ८५ हून अधिक बसगाड्या सोडले होते. या बसगाड्यांचा वापर करून ४७१ बसफेऱ्या चालवण्यात आले आहे. त्यामधून तब्बल ४८ हजार ९०९ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे बेस्टला ३ लाख १७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
बेस्टने सोडल्या जादा बस: प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाने शनिवार रात्री १०.३० ते रविवारी सकाळी ६.३० वाजेपर्यत सीएसएमटी- वडाळा, सीएसएमटी - दादर आणि भायखळा (प) - कुलाबा या मार्गावर १२ जादा बस चालविले. यासह 3 मार्गांवर १२ जादा बसेस बेस्टकडून चालवल्या. तसेच रविवारी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यत इलेक्ट्रिक हाऊस- वडाळा (प), सीएसएमटी- धारावी डेपो, मुखर्जी चौक- प्रतीक्षा नगर, मंत्रालय- माहुल, इलेक्ट्रिक हाउस- के सर्कल आणि अँटॉप हिल- कोतवाल उद्यान या मार्गावर ३५ जादा बस सोडण्यात आल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले आहे.