मुंबई : कोरोनाचे सावट पुन्हा एकदा जगावर घोंगावताना दिसत आहे. चीनच्या काही भागांमध्ये करोनाने पुन्हा एकदा हाहाकार (Spread of corona virus) गाजवलेला आहे. ( corona virus was noticed ) लाखो रुग्ण रोज नव्याने सापडत आहेत. चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या ही अत्यंत भीतीदायक असून, जवळपास सर्वच देशाने या संबंधी सुरक्षा वाढवण्यासाठी पावले उचलायला सुरू केली आहेत. चीन हा भारतालगतचा देश असल्यामुळे भारताला पुन्हा एकदा करोनाचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Due to corona virus fear ) गेल्या वेळच्या तीन कोरोनाच्या लाटांमध्ये देशाचे मोठे नुकसान झाले होते. ( thirty to forty percent increase in drug sales ) व्यवसाय, उद्योग धंदा, नोकरी अशा सर्वच क्षेत्राला याचा मोठा फटका बसला. प्रत्येक व्यक्तीला या रोगामुळे कमी अधिक प्रमाणात फटका बसत असल्याने यावेळी पुन्हा एकदा कोरोनाची चाहूल लागत असल्यामुळे भारतातही भीतीच वातावरण पाहायला मिळत आहे. ( Corona BF7 Variant )
सॅनिटायझर आणि मासच्या विक्रीत 30 टक्के वाढ :तीन वर्षांपूर्वी कोरोना नेमका आहे काय? हा रोग नेमका कसा होतो ? आणि याला थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? याची महिती अनेकांना नव्हती. मात्र आता जागरूकता वाढली आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक औषधाकडे (Corona preventive medicine) धाव घेत आहेत. खास करून यामध्ये सॅनिटायझर आणि मास्क सहित इतर औषधांच्या विक्रीत गेले पाच ते सहा दिवसात वाढ झाली असल्याचे फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी माहिती दिली आहे. (Food and Drug License Holder) ही वाढ जवळपास 30 ते 40 टक्के एवढी आहे. गेले दीड वर्ष कोरोनाचे सावट कमी झाल्याकारणाने लोक निश्चित झाली होती. पूर्वीप्रमाणे सॅनिटायझर आणि मास्कची विक्री ( Sale of sanitizers and masks ) जवळपास 30 ते 35 टक्क्याने वाढली आहे. तर तेथेच अँटीसेप्टिक लिक्विड ( Antiseptic liquid ) घेण्याचे प्रमाणही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
या औषधांची मागणी वाढली :N 95 मास्क, सॅनिटायझर, अँटीसेप्टिक लिक्विड, इम्युनिटी बूस्टर औषध, थर्मामीटर, ऑक्सी मीटर.
मेडिकल कडून औषधांच्या मागणीत वाढ :चीनमधून कोरोना वाढण्याच्या भीती निर्माण झाल्यानंतर मास्क सॅनिटायझर अँटीसेप्टिक लिक्विड याच्यासह इतर औषधांची मागणी वाढली आहे. गेले काही महिन्यात जिथे काही अँटीसेप्टिक लिक्विड बाटल्यांची, सॅनिटायझरच्या बाटल्यांची मागणी मेडिकल कडून होत होती. तिथेच आता ही मागणी वाढली आहे. तसेच N 95 मास्कची ( N 95 mask ) आणि इम्युनिटी बूस्टर औषधांची देखील मागणी ( Demand for Immunity Booster Medicines ) वाढली आहे. या औषधांचा साठा मेडिकल मध्ये करून ठेवला जातो आहे. यामुळे ड्रॅग सप्लायर यांच्याकडून या सर्व वस्तूंची मोठी प्रमाणात खरेदी सुरू झाली असून या औषध, मास्क आणि इतर उपकरणांचा ३० टक्के अधिकचा स्टॉक करण्यात आला असल्याचे अभय पांडे यांनी सांगितला आहे.