मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असताना राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने राबवलेल्या उपाययोजनांमुळे रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणखी वाढून आता तब्बल 37 दिवसांवर गेला आहे. तर मुंबईमध्ये एच ईस्ट, एफ उत्तर आणि ई विभागांमधील रुग्ण वाढीचा दर 1 टक्के पेक्षा कमी असल्याचे मुंबई महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.
मुंबईत कोरोनाचे रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 37 दिवसांवर
सोमवारी (22 जून) मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 67 हजार 635 वर पोहचला आहे. त्यापैकी 3 हजार 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईमधून आतापर्यंत 34 हजार 119 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईमधील खार येथील एच पूर्व विभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या विभागात 13 जूनला 2 हजार 993 रुग्ण होते. 20 जूनला 3 हडाक 182 रुग्णांची नोंद झाली आहे. या विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 79 दिवसांवर पोहचला आहे. एच पूर्व शिवाय माटुंगा येथील एफ उत्तर विभागातही रुग्ण दर वाढीचा दर 76 दिवस इतकाच आहेत. तर भायखळ्याच्या ई विभागाचा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 73 दिवस इतका आहे. एवढेच नाही तर 1 टक्के पेक्षा कमी रूग्ण वाढीचा सरासरी दर नोंदवणारा एच पूर्व काल हा पहिला विभाग ठरला होता. सोमवारी या विभागांसोबतच एफ उत्तर आणि ई विभागांचा रूग्ण वाढीचा सरासरी दर 0.9 टक्के असा झाला आहे.
सोमवारी (22 जून) मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 67 हजार 635 वर पोहचला आहे. त्यापैकी 3 हजार 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईमधून आतापर्यंत 34 हजार 119 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे 29 हजार 781 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 50 टक्क्यांवर पोहचला आहे. 15 ते 21 जून पर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.88 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दर वाढीचा दर 37 दिवसांवर पोहचला आहे. मुलुंड, भांडूप, अंधेरी, मालाड, बोरीवली, कांदिवली आणि दहिसर भागातील वाढते रूग्ण आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने मिशन झिरो सुरू केले आहे.