मुंबई - मुंबईमधील धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने गेल्यावर्षी ती हॉटस्पॉट बनली होती. मात्र, याच धारावीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रविवारी (4 जुलै) चौथ्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत धारावीत 10 वेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, धारावीत सध्या २२ सक्रिय रुग्ण आहेत.
जे होऊ नये तेच झाले -
मागील वर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर जे होऊ नये, ज्याची भीती होती, तेच झाले. धारावीसारख्या दाटीवाटीची झोपडपट्टीही कोरोना हॉटस्पॉट ठरली. १ एप्रिल 2020 रोजी धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. जुलै-ऑगस्टनंतर धारावीत रुग्णसंख्या घटत गेली. त्यानंतर दोन अंकी असलेली रोजची रुग्णसंख्या एकवर आली. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली.
धारावीत 10 वेळा शून्य रुग्ण -
२४ डिसेंबर २०२० रोजी पहिल्यांदा, २२ जानेवारी २०२१ रोजी दुसर्यांदा, २६ जानेवारीला तिसर्यांदा, २७ जानेवारीला चौथ्यांदा, ३१ जानेवारीला पाचव्यांदा, २ फेब्रुवारीला सहाव्यांदा धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेदरम्यान धारावीतही रुग्णसंख्या वाढली होती. मात्र, धारावीकरांनी पुन्हा करून दाखवलं. धारावीत १४ जून, १५ जून, २३ जूनला एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आज ४ जुलैला पुन्हा धारावीत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे धारावीत आतापर्यंत 10 वेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत ६ हजार ९०१ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ६ हजार ५२० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या २२ सक्रिय रुग्ण आहेत.
धारावी मॉडेल -