मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज शेतकऱ्यांच्या बाबतीत मोठी घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही अटीविना सरसकट २ लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली. या निर्णयाचे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनी स्वागत केले आहे. इडा पिडा टळली... बळीचं राज्य आलं! अशा आशयाचे ट्वीट करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केले आहे.
'इडा पिडा टळली... बळीचं राज्य आलं'!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज शेतकऱ्यांच्या बाबतीत मोठी घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही अटीविना सरसकट २ लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली. या निर्णयाचे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनी स्वागत केले आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही अटीशिवाय ही कर्जमाफी केली जाणार असून पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार असल्याचे मुंडे म्हणाले.
१६ डिसेंबरपासून सुरु असणाऱ्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. आज शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्जमाफीचा समाधानकारक निर्णय झाला. मात्र, विरोधकांनी यावर टीका केली आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या सरकारने २ लाखांची कर्जमाफी करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका करत विरोधकांनी सभात्याग केला.