मुंबई - निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी मद्य वाटले जाते. त्यामुळे अनधिकृत मद्यविक्रीही मोठ्या प्रमाणात होते. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ३ कोटी ७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तरीही ही कारवाई संथ गतीने चालू असल्याचे सांगितले जात आहे.
उत्पादन शुल्क विभागाकडून अनधिकृत मद्यविक्रीवर कारवाई, ३ कोटी ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज्यात मद्यविक्रीचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. निवडणुकीचा हंगाम लक्षात घेता, कारवाईसाठी राज्यांच्या सीमांवर ४० तपास नाके तयार करण्यात आले आहेत. राज्यातील सर्व देशी व विदेशी मद्य निर्मिती कारखान्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे.
राज्यात मद्यविक्रीचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. निवडणुकीचा हंगाम लक्षात घेता, कारवाईसाठी राज्यांच्या सीमांवर ४० तपास नाके तयार करण्यात आले आहेत. राज्यातील सर्व देशी व विदेशी मद्य निर्मिती कारखान्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. ११ मार्च ते २५ मार्च या कालावधीत तब्बल २२११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात अनधिकृत हातभट्ट्या, रसायन, ताडी, देशी मद्य, विदेशी मद्याचा समावेश आहे.
विविध ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत अनधिकृत मद्याची आयात निर्यात करणाऱ्या १०० गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. यात दोन दुचाकी, तीन चारचाकी वाहनांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीमांना लागून असलेल्या इतर राज्यात ज्या दिवशी निवडणुका असतील त्याच्या दोन दिवस आधी राज्याच्या सीमेपासून ५किमी अंतराच्या आतील सर्व मद्यविक्रीची दुकाने, बार, परमिट हॉटेल उत्पादन शुल्क विभागाकडून बंद ठेवण्यात येणार आहे.