मुंबई - मुलुंड येथील म. तू. अग्रवाल रुग्णालयाच्या पुनर्निर्माणाचे श्रेय घेण्यावरून मनसे आणि भाजपमध्ये वाद रंगला आहे. सकाळीच मनसेने या ठीकानी भूमिपूजन कार्यक्रम केला.
मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयाच्या पुनर्निर्माणाचे श्रेय घेण्यासाठी मनसे, भाजपमध्ये रंगली
मुलुंड येथील म. तू. अग्रवाल रुग्णालयाच्या पुनर्निर्माणाच्या श्रेयाचा मनसे आणि भाजपमध्ये वाद रंगला आहे. सुमारे 350 कोटी रुपये खर्च करून पालिका हे रुग्णालय नव्याने उभारत आहे. मात्र, या रुग्णालयाचे श्रेय नक्की कोणाचे यावरून मुलुंडमधील नागरिक संभ्रमात आहेत.
मुलुंड येथील म. तू. अग्रवाल रुग्णालयाच्या पुनर्निर्माणाच्या श्रेयाचा मनसे आणि भाजपमध्ये वाद रंगला आहे. सुमारे 350 कोटी रुपये खर्च करून पालिका हे रुग्णालय नव्याने उभारत आहे. मात्र, या रुग्णालयाचे श्रेय नक्की कोणाचे यावरून मुलुंडमधील नागरिक संभ्रमात आहेत. या ठिकाणी भाजपने आणि मनसेने श्रेय घेणारे फ्लेक्स लावले आहेत. आज या रुग्णालयाचा भूमिपूजन कार्यक्रम खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते होणार होता. मात्र, त्या अगोदरच मनसेने या ठिकाणी भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पाडला. या वेळी मनसेने भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली.