मुंबई -सायन कोळीवाडा परिसरातील एम.ए रोडवर शनिवारी दुपारी 1 च्या दरम्यान एका भरधाव डंपरने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पिता पुत्रांतील 9 वर्षांच्या रणजित मनीष कानोजिया या मुलाचा मृत्यू झाला. वडील मनीष कानोजिया (वय 35) यांना जखमी अवस्थेत सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डंपरच्या धडकेत 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी - bike
ही घटना घडल्यानंतर डंपर चालक अजब नारायण पाल पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, रस्त्यावरील नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप देत अंटोप हिल पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

डंपर च्या धडकेत 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू , वडील गंभीर जखमी
डंपरच्या धडकेत 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
ही घटना घडल्यानंतर डंपर चालक अजब नारायण पाल पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, रस्त्यावरील नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप देत अंटोप हिल पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.