महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Daughter Did Kanyadan Of Mother : लेकीने केले आईचे कन्यादान; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

आतापर्यंत तुम्ही दिराने केले वहिनीशी लग्न, सासऱ्यांनी विधवा सुनेचे दुसरे लग्न लावून दिले अशा आशयाच्या बऱ्याच बातम्या वाचल्या असतील. मात्र, तुम्ही कधी अशी बातमी वाचली आहे का? की, मुलीने केले आईचे कन्यादान... अर्थात नसेलच. पुढारलेले विचार असणाऱ्या आपल्या आईचे दुसरे लग्न लावून देणाऱ्या लेकीचे नाव आहे देबर्ती चक्रवर्ती.

By

Published : Jan 30, 2023, 10:12 PM IST

Updated : Jan 30, 2023, 10:45 PM IST

Daughter Did Kanyadan Of Mother
लेकिने केले आईचे कन्यादान

मुंबई:झाले असे की, देबर्ती चक्रवर्ती या तरुणीने आपल्या आईचे दुसरे लग्न लावून दिले आणि देबर्तीने स्वतः आपल्या आईचे कन्यादान केले. त्यामुळे देवर्षी सध्या माध्यमांमध्ये चर्चेत आहे. लेकरे वयात आली की, सर्वच आई-वडिलांची इच्छा असते की, आपल्या लेकरांची वेळेत लग्न व्हावी. आपण त्यांचे कन्यादान करावे आणि आपल्या लेकरांचा सुखी संसार पहावा. मात्र, देवर्षीच्या बाबतीत काहीसे वेगळेच घडले. ही गोष्ट आहे मेघालयची राजधानी शिलाँग येथील रहिवासी देबर्ती चक्रवर्ती आणि तिची आई मौसमी चक्रवर्ती यांची.

देबर्ती चक्रवर्तीचा तिच्या आईसोबतचा फोटो

2 वर्षांची असताना वडिलांचे निधन :देबर्तीने दिलेल्या माहितीनुसार, तिचे वडील शिलाँगचे प्रसिद्ध डॉक्टर होते. लहान वयातच ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचे अचानक निधन झाले. तेव्हा तिची आई 25 वर्षांची होती आणि ती स्वतः 2 वर्षांची होती. वडिलांच्या निधनानंतर देबर्ती आणि त्यांची आई शिलाँगमध्ये त्यांच्या आजीच्या घरी राहू लागले. तिची आई शिक्षिका होती.

देबर्ती आणि तिची आई

कोर्ट कचेरीत बराच काळ गेला :देबर्ती सांगते की, 'मला नेहमी वाटायचे की आईने आता एक जोडीदार शोधावा. पण ती म्हणायची, माझे लग्न झाले तर तुझे काय होईल? वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवरून काकासोबत घरात वाद सुरू होता. ते कायदेशीर लढाईपर्यंत पोहोचले. या सगळ्या गोष्टींमध्ये तीही अडकली होती. या सर्व कोर्ट कचेरीमध्ये बराच काळ निघून गेला. मी मोठी झाली आईचे वय देखील वाढत होते. मात्र, आईला एक जोडीदार असावा हे सतत माझ्या मनात होते. ते अखेर आता सत्यात उतरले.'

देबर्तीसोबत तिची आई


मी माझ्या आईचे कन्यादान केले :देबर्ती आता सध्या कामानिमित्त मुंबईत राहते. ती फ्रिलान्स टॅलेंट मॅनेजर म्हणून काम करते. आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगताना देबर्ती म्हणाली, दुसरे लग्न करण्याचा निर्णय घ्यायला आईला खूप वेळ लागला. आधी मी तिला कोणाशी तरी मैत्री करायला सांगितली. सुरुवातीला मी एवढेच म्हटले की निदान इतर लोकांशी बोल. मित्र बनव मग मी म्हणाले कि, आता लग्न कर. अशाप्रकारे माझ्या आईने तिचा जोडीदार शोधला आणि मी माझ्या आईचे लग्न लावून दिले आणि तिचे कन्यादान केले. आता मला खूप भारी वाटते की मी माझ्या आईचे कन्यादान केले.


आता आई एकदम खुश :2022 साली मार्च महिन्यात देबर्तीच्या आईचे पश्चिम बंगालमधील स्वपनसोबत लग्न झाले. दोघेही 50 वर्षांचे आहेत. स्वपनचे हे पहिले लग्न असल्याचे देबर्ती सांगतात. लग्नानंतर आईच्या आयुष्यात खूप बदल झाल्याचे तिने सांगितले. ती आता खूप खूश आहे. पूर्वी ती प्रत्येक गोष्टीवर चिडायची. पण आता तिला खूप आनंद येत आहे, असे देबर्ती सांगते.

हेही वाचा :Thane Crime : धक्कादायक! १५ वर्षीय विद्यार्थ्याचे ३२ वर्षीय विवाहितेकडून लैंगिक शोषण

Last Updated : Jan 30, 2023, 10:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details