महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जन्मदात्या पित्यानेच केली गर्भवती मुलीची हत्या; 'हे' आहे कारण

घाटकोपरमध्ये रविवारी सकाळी घडलेल्या एका तरुणीच्या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला. यात वडिलांनीच मुलीची हत्या केली असल्याचे उघडकीस आले आहे.

आरोपीसह पोलीस पथक

By

Published : Jul 15, 2019, 10:16 PM IST

मुंबई- घाटकोपरमध्ये रविवारी सकाळी घडलेल्या एका तरुणीच्या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला. यात वडिलांनीच मुलीची हत्या केली असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपी वडील राजकुमार चौरसिया याला अटक करण्यात आली आहे.

मृत मीनाक्षी चौरसिया (वय २० वर्षे) हीचे ब्रिजेश चौरसिया नावाच्या तरुणासोबत प्रेम संबंध होते. हे प्रेम संबंध वडील राजकुमार चौरसिया यांना मान्य नव्हते. वडिलांनी मीनाक्षीचे २ वेळा लग्न इतर ठिकाणी जमवले होते. मात्र, मीनाक्षीने दोन्ही वेळा वडिलांनी जमवलेल्या लग्नास नकार देत पळून जाऊल लग्न केले होते. यामुळे पित्याने मुलीची हत्या केली. पोलिसांनी खूनी पित्यास अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

जन्मदात्या पित्यानेच केली गरोदर मुलीची हत्या 'हे' आहे कारण

अल्पवयीन असताना गेली होती पळून

मीनाक्षीच्या वडिलांनी मीनाक्षीचे लग्न ठरवले होते. मात्र, त्यास नकार देत मीनाक्षी घरातून पळून गेली. पळून गेल्यावेळी ती अल्पवयीन होती. लग्नाचे वय होताच दोघांनी मार्च महिन्यात लग्न केले. दरम्यान, ब्रीजेश चौरसीया आणि मीनाक्षीचे वडील राजकुमार चौरसिया यांच्या घरचे संबंध सुधारू लागले. पण, मुलीने मनाविरूद्ध पळून जाऊन लग्न केल्याचा राग राजकुमारच्या मनात होता.


पानवाल्याशी विवाह केल्याने कुटुंबाचा रोष
गावामध्ये आपल्या समाजात अब्रू गेली. लोक काय म्हणतील, एका पानवाल्याशी तीने विवाह केला, अशा विविध प्रश्नांनी राजकुमारच्या मनात सल कायम होती. राजकुमारने मुलीला खर्चासाठी पैसे आणि कपडे देतो, असे सांगून बाहेर बोलावले. त्यानंतर तीक्ष्ण हत्याराने मीनाक्षीचा गळा चिरून निर्घृण हत्या केली.

चार महिन्याची होती गर्भवती
मृत्यूनंतर मीनाक्षीच्या शवविच्छेदनात ती ४ महिन्याची गरोदर असल्याची बाब उघड झाली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details