मुंबई -मुंबईतदिवाळी खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरु झाली ( Crowd of citizens for Diwali shopping ) आहे. मश्चिद बंदर, कॉफर्ड मार्केट, दादर, हिंदमाता, वांद्रे, कुर्ला आदी बाजारपेठा गजबजून निघाल्या आहेत. खरेदीसाठी मोठी झुंडब उडाली आहे. सायंकाळच्या सुमारास बाजारपेठेत तुफान गर्दी वाढते. कोरोनानंतरची पहिली दिवाळी असली तरी महागाईमुळे खरेदीदारांवर मोठा परिणाम होतो ( Diwali shopping Impact On Buyers ) आहे.
साफसफाईची लगबग सुरू - दिवाळी' हा शब्द उच्चारला, तरी आपल्या अंगात उत्साह संचारतो, मन हर्षोल्हासित होते. नवी खरेदी, फराळाचे नानाविध पदार्थ, रांगोळी-रोषणाई, भेटवस्तू आणि आनंदी आनंद अशा वातावरणाची आस आपल्याला लागते. घरातील साफसफाईची लगबग सुरू होते. यंदा २३ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरुवात होणार आहे. २४ ऑक्टोबरला नरकासूर वध व सायंकाळी लक्ष्मीपूजन तर २६ ऑक्टोबरला दिवाळी पाडवा आणि भाऊबीज आहे. या निमित्तीने दिवाळी धूम राज्यभरात पहायला मिळणार आहे. मुंबई सारख्या शहरांत दिवाळीत खरेदीचे हमखास ठिकाण म्हणजे, दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट. खरेदीदारांची मोठी गर्दी असलेली महत्त्वाची बाजारपेठ आहे. क्रॉफर्ड मार्केट परिसरात प्रामुख्याने घाऊक विक्रेते आहेत. परंतू दिवाळीसाठी लागणारा सुका मेवा, आकाश दिवे, रोषणाईचे साहित्य परवडणाऱ्या दरात येथे मिळतात. त्यामुळे खरेदीसाठी इकडे चांगली गर्दी असते. त्यामुळे येथील दुकानातही चांगली गर्दी आहे.
तोरण आणि कंदील -दक्षिण मुंबईतील लोहार चाळ येथे वेगवेगळ्या प्रकारचे कंदील, इलेक्टिक तोरण तसेच सजावटीच्या साहित्य ( Diwali shopping Of Electric Lantern ) मिळतात. छोटी मोठी इलेक्ट्रॉनिकची दुकाने मोठ्या संख्येने येथे आहेत. अत्यंत कमी दरात कंदीलांची विक्री ( Lanterns Sale At Low Prices ) होते. सध्या बाजारात झुंबर, तोरणे, स्लावर, रिंग बॉल असे वेगळे प्रकार आले आहेत. सत्तर रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. दिवाळीला दहा दिवस बाकी आहेत. गिऱ्हाईक यायला सुरुवात झालेली नाही. गणपतीला बऱ्यापैकी गिऱ्हाईक होते, असे सदगुरु कृपा दुकानांचे मालक मनोज डिसले यांनी सांगितले.