मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याचा कालावधी आता १३ वरून १६ दिवस झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या २४ पैकी ६ विभागांमध्ये हे प्रमाण २० दिवस इतके झाले आहे. तसेच पूर्वी हॉटस्पॉट म्हणून ओळख बनलेल्या वरळी येथील जी दक्षिण, धारावी, दादरचा जी उत्तर, चेंबूर गोवंडीचा एम पूर्व विभाग यांचा समावेश आहे. मुंबईतील कोरोना मृत्यूदर देखील यापूर्वीच नियंत्रणात आला आहे. सध्या तो ३.२ टक्के म्हणजे राष्ट्रीय सरासरीच्या जवळ आहे.
मुंबईत रुग्णवाढ दुप्पट्टीचा सरासरी कालावधी १३ वरून १६ दिवसांवर - मुंबई कोरोना अपडेट
महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोविड १९ संक्रमण रोखण्यासाठी होत असलेल्या दैनंदिन कार्यवाहीचा आढावा घेतला. मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याचा कालावधी आता १३ वरून १६ दिवस झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष बैठकीदरम्यान महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोविड १९ संक्रमण रोखण्यासाठी होत असलेल्या दैनंदिन कार्यवाहीचा आढावा घेतला. या बैठकीदरम्यान महापालिका क्षेत्रामध्ये विविध कोरोना समर्पित रुग्णालये, आरोग्य केंद्र आदी ठिकणी दाखल झालेल्या रुग्णांपैकी सुमारे ४३ टक्के रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आल्याची माहिती देण्यात आली. मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून १३ वरुन आता १६ दिवस इतका झाला आहे. यावरून रुग्ण वाढीचा वेग मंदावत असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी १६ दिवसांच्या आहे. मात्र, काही विभागांनी त्याहून जास्त चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये ई, एफ उत्तर, जी दक्षिण, जी उत्तर, एच पूर्व, एम पूर्व विभागांची ही सरासरी २० दिवस आहे. तर डी विभाग १९ दिवस, ए विभाग आणि एल विभाग १७ दिवस, के पश्चिम विभाग १८ दिवस, बी विभाग १६ दिवस याप्रमाणे विविध विभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला आहे. रुग्ण बरे होण्याचे वाढलेले प्रमाण आणि संक्रमणाचा कालावधी वाढणे या दोन्ही कामगिरीबद्दल आयुक्त चहल यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच, मुंबईतील कोरोना मृत्यूदर देखील यापूर्वीच नियंत्रणात आला आहे. सध्या तो ३.२ टक्के म्हणजे राष्ट्रीय सरासरीच्या जवळ आहे.