महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना सत्तेतून हद्दपार करा, आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया

राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातील चौथीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हद्दपार करण्यात आल्याने त्याविरोधात राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. छत्रपती शिवरायांचा अवमान हा देशाचा अवमान असून तो आम्ही कदापी सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.

शिवाजी महाराजांचा धडा चौथीच्या पुस्तकातून काढण्याच्या निर्णयावर नेत्यांच्या प्रतिक्रिया

By

Published : Oct 17, 2019, 5:44 PM IST

मुंबई - राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातील चौथीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हद्दपार करण्यात आल्याने त्याविरोधात राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ज्या सरकारने शिवाजी महाराजांना चौथीच्या पुस्तकातून वगळले. त्या सरकारला येत्या 21 तारखेला मतदान करून सत्तेतून हद्दपार करा, आणि त्यांना धडा शिकवा, असे आवाहन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आले आहे.

छत्रपती शिवरायांचा अवमान हा देशाचा अवमान असून तो आम्ही कदापी सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे. त्या सोबतच विविध सामाजिक संघटनांनीही राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून राजकारण करणाऱ्या सेना-भाजपला विविध सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लक्ष्य करण्यात आले आहे.

शिवाजी महाराजांचा धडा चौथीच्या पुस्तकातून काढण्याच्या निर्णयावर नेत्यांच्या प्रतिक्रिया


काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या सेना-भाजपला खऱ्या अर्थाने जागा दाखवण्याची हीच वेळ असल्याची टीका त्यांनी केली आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही सेना-भाजपचा खरा चेहरा या प्रकरणातून समोर आला असल्याची टीका केली आहे. यांना शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अवमान करायचा आहे. त्यामुळेच, त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने अरबी समुद्रात असलेल्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचीही अशीच थट्टा केली असल्याची प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - पुस्तकातून शिवरायांचा धडा बाजूला करणाऱ्या सरकारला हाकलून लावा - अशोक चव्हाण

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांनीही सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, भारतीयांचा जाज्वल्य अभिमान असलेल्या शिवछत्रपतींचा घोर अपमान उठता बसता छत्रपतींचे नाव घेणाऱ्या या सरकारने केला आहे. गेल्या ५० ते ६० वर्षांपासून चौथीच्या पाठ्यपुस्तकात असलेला छत्रपतींवरील धडा वगळण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. हा निर्णय अत्यंत चूकीचा आणि अपमानास्पद असल्याचे त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. छत्रपतींवरील धडा वगळू नये, या विधिमंडळाने केलेल्या ठरावाचेही उल्लंघन या सरकारने केल्याची टीका त्यांनी केली. महाराजांचा इतिहास जनमानसातून पुसून टाकण्याच्या भाजपचा हा कट असल्याचेही ते म्हणाले. शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या भाजपला २१ तारखेला धडा शिकवल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, असा उद्रेक मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - मुंबईतील पाच बोगस डॉक्टर अटकेत, सातवी नापसाचाही समावेश

हेही वाचा - प्रकाश मेहतांची नाराजी विरोधकांच्या पथ्यावर...कोणाला होणार फायदा?

ABOUT THE AUTHOR

...view details