महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा माज करू नये; मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीस यांना टोला

राज्याचे मुख्यमंत्रीपद माझ्यासाठी स्वप्नवत वाटण्याच्या पलिकडलेच आहे. त्या पदाचा विचार ही केला नव्हता. मात्र, जी जबाबदारी माझ्या समोर येते त्यास सामोरे जात मी कर्तव्य करून दाखवतो. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाहीतील सत्ता असली पाहिजे, सत्ताधाऱ्यांनी माज करू नये, असे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

cm udhhav thakrey pc
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Dec 1, 2019, 7:25 PM IST

Updated : Dec 1, 2019, 8:32 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावात फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. यानंतर काही अवधी होताच सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा माज करू नये, असे म्हणत पुन्हा फडणवीसांनी टोला लगावला आहे. विशेष अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विधान भवनातील पत्रकार परिषदेला छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्रीपद माझ्यासाठी स्वप्नवत वाटण्याच्या पलिकडलेच आहे. त्या पदाचा विचार ही केला नव्हता. मात्र, जी जबाबदारी माझ्या समोर येते त्यास सामोरे जात मी कर्तव्य करून दाखवतो. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाहीतील सत्ता असली पाहिजे, सत्ताधाऱ्यांनी माज करू नये, असे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव न घेता ठाकरे यांनी टीका केली.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मोदींना विरोध करणारे साकोलीचे नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध

मला राज्यातील परिस्थितीची जाणीव आहे. सरकार बदलले, सत्तेचे समीकरण बदलले आहे. विरोधी पक्षाला मी शत्रू समजत नाही. विरोधी पक्षांनीही जनतेच्या भल्यासाठी कार्यरत राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. तर केंद्रात भाजप सरकार असले तरी हे सरकार जनतेच्या भल्यासाठी काम करत असे आम्ही समजतो. त्यामुळे वेळ आल्यास शेतकऱ्यांसाठी केंद्रातून मदत आणण्यासाठी आम्ही विरोधकांनाही सोबत घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बुलेट ट्रेनसह सर्व विकास प्रकल्पांचा आढावा घेणार -

सरकार आता नव्याने स्थापन झाले आहे. राज्यातील ऊस प्रकल्प कसे सुरू आहेत? या प्रकल्पांची स्थिती काय आहे? तसेच कोणत्या प्रकल्पांची सध्या गरज आहे? या गोष्टींचा लवकरच आढावा घेऊन पुढील भूमिका ठरवू असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहरातून हजारो कोटी रुपयांचा महसूल केंद्रात पाठविला जातो. म्हणून केंद्रानेही महाराष्ट्राला त्यांचा अपेक्षित वाटा देणे गरजेचे आहे. याबाबत लवकरच केंद्र सरकारसमोर भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा -देवेंद्र फडणवीस नवे विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले अभिनंदन

लवकरच मोदींची भेट घेणार -

मुख्यमंत्री झाल्यानंतर अभिनंदनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता. त्यांनी शुभेच्छा दिल्या. तर लवकरच शेतकऱ्यांसाठी पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे ही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, सरकारच्या खातेवाटपाबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ असेही त्यानी सांगितले.

Last Updated : Dec 1, 2019, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details