मुंबई - वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) युद्धपातळीवर उभारण्यात येणाऱ्या एक हजार खाटांची क्षमता असलेल्या कोविड-१९ रुग्णालयाच्या कामाला आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भेट दिली. कोरोना विषाणूच्या फैलावाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन येत्या १५ दिवसांत मुंबईतील बीकेसी येथे एक हजार खाटांचे सर्व वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येणाऱ्या या महत्वाकांक्षी उपक्रमास आज स्वतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भेट देत जोमाने व युद्धपातळीवर सुरू असलेल्या या रुग्णालयाच्या कामाची पहाणी केली. तसेच, सर्व तज्ज्ञ मंडळींसोबत चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांनी केली बीकेसीत होणाऱ्या एक हजार खाटांच्या कोविड रुग्णालयाची पाहणी
वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) युद्धपातळीवर उभारण्यात येणाऱ्या एक हजार खाटांची क्षमता असलेल्या कोविड-१९ रुग्णालयाच्या कामाला आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भेट दिली. येत्या १५ दिवसांत मुंबईतील बीकेसी येथे एक हजार खाटांचे सर्व वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी केली बीकेसीत होणाऱ्या एक हजार खाटांच्या कोविड रुग्णालयाची पाहणी
ठाणे येथील ज्युपिटर हाॅस्पिटल व एमएमआरडीए यांच्या संयुक्त निदर्शनाखाली या रुग्णालयाची निर्मिती करण्यात येत आहे. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, एमएमआरडीए आयुक्त आर. राजीव आदी मान्यवर उपस्थित होते.