महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपला 50 टक्क्यांहून अधिक मतदान होण्यासाठी कामाला लागा, मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून संघटनपूर्व सदस्यता अभियानचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वांद्रे येथील रंगशारदा येथे करण्यात आला. यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि सुरेश प्रभू हे उपस्थित होते. यावेळी फडणवीस बोलत होते.

By

Published : Jul 7, 2019, 2:49 AM IST

Updated : Jul 7, 2019, 8:08 AM IST

भाजपला 50 टक्क्यांहून अधिक मतदान होण्यासाठी कामाला लागा, मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

मुंबई - येत्या विधानसभा निवडणुका पाहता 50 टक्के मतदार भाजपाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी सदस्य नोंदणी मोहीम हा एक रोड मॅप असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करत मुख्यमंत्र्यांनी भाजप विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सुचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

भाजपला 50 टक्क्यांहून अधिक मतदान होण्यासाठी कामाला लागा, मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून संघटनपूर्व सदस्यता अभियानचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वांद्रे येथील रंगशारदा येथे करण्यात आला. यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, सुरेश प्रभू, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, प्रकाश मेहता आदी उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीत साडे पाच कोटी लोकांनी मतदान केले त्याच्या अर्ध्या लोकांनी भाजपाला मतदान करावे, यासाठी एक कोटी घरांमधील लोक भाजपाचे सदस्य करा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.


देशाची अर्थव्यवस्था 2025 पर्यंत 5 ट्रीलियन डॉलर करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असल्याने राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रीलियन डॉलर केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गेली 5 वर्षे जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. पुढील 5 वर्षांत दुष्काळाचा भूतकाळ करण्यासाठी काम करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

370 कलम हटवणे गरजेचे -

काश्मीर हा भारताचे अविभाज्य अंग असले तरी 370 कलमामुळे भारतापासून विभक्त करण्याचे बीज पेरले जात आहे. हे कलम हटवले तर काश्मीर खऱ्या अर्थाने भारताचा अविभाज्य अंग होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही 370 कलमाची समीक्षा केली जाईल असे सांगितले.

युतीची चिंता करू नका -

भाजपाने 50 टक्के मतदार आपल्या पाठीशी उभे राहतील यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यावरून युतीचे काय होणार, मित्र पक्षांचे काय होणार, असे अनेक प्रश्न पडले असले तरी त्याची चिंता करू नका. 50 टक्के मतदार युतीतील पक्षांच्या पाठीशी राहतील यासाठीही भाजप प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Last Updated : Jul 7, 2019, 8:08 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details