राज्याच्या विकासासाठी चांगली गुंतवणूक आणू मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दावोस दौरा रद्द केला. मात्र आज पुन्हा एकदा दावोस दौऱ्यावर जाणार असून मोठी गुंतवणूक आणणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. टाटाची 18 वी मुंबई मॅरेथॉन आज मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडली. वयोवृद्धांपासून ते दिव्यांगांपर्यंत सर्व स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. सकाळी पाच वाजल्यापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी मनःपूर्वक आभार मानले.
पोलीस प्रशासनाचे कौतूक : गेली दोन वर्ष कोविडचे निर्बंध होते. मात्र आज मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. सगळ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. मोठे चैतन्य या ठिकाणी पाहायला मिळाले. आयोजकांनी अतिशय उत्तम नियोजन केले आहे. सुमारे 55 हजार स्पर्धकांनी भाग घेतला असला तरी पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेचे उत्तम नियोजन केल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचे तोंड भरून कौतुक केले. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल देखील या स्पर्धेत सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांचेही अभिनंदन केले.
राज्यासाठी मोठी गुंतवणूक आणू : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 17 जानेवारी पासून 19 जानेवारीपर्यंत तीन दिवसाच्या दावोस दौऱ्यावर जाणार होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 19 जानेवारीला मुंबईत येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दावोस दौरा रद्द केला होता. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. याबाबत मुख्यमंत्र्याना विचारले असता, दावोसला जाऊन राज्याच्या विकासासाठी चांगली गुंतवणूक आणू अशी ग्वाही दिली. त्यामुळे मुख्यमंत्री कधी दावोसला जाणार आणि किती गुंतवणूक आणणार हे पाहणे, महत्वाचे आहे.
टाटा मॅरेथॉनमध्ये स्वच्छतेचा संदेश : टाटा मॅरेथॉनमध्ये स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. 'पानसिंग थुक कर देशपर धब्बा' अशा आशयाचा संदेश आणी जानजागृतीचे पोस्टरकपड्यांवर चिटकवून एक कॉलेजचा मुलगा टाटा मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला होता. घातलेले कपडे पान थुंकल्यावर कसे दिसतात याप्रमाणे रंगवलेले होते. स्वच्छते संबंधीत प्रत्येक माहिती त्यांने केलेल्या वेशभूषेतून दिली. आशिष असे त्या मुलाचे नाव आहे. या त्याने मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी सराव तर केलाच पण आठवडाभर यानिमित्ताने लोकांपर्यंत एक संदेश नेण्यासाठी म्हणून त्याने यावर काम करायचे ठरवले. त्याच्या हातात स्वतः बनवलेले पोस्टर होते. ज्यामध्ये भारताचा नकाशा होता आणि त्याला वेगवेगळ्या रंगाने रंगवलेले होते. त्यामध्ये देशाचे कोणते राज्य स्वच्छतेबेबत किती पुढे, किती मागे आहे याबद्दलची थोडक्यात माहिती होती.
साताऱ्याच्या तरुणांचा रणअप : टाटा मुंबई मॅरेथॉनची अठरावी स्पर्धा आज मुंबई पार पडली. सातारच्या तीन तरुणांनी २१ किलोमीटरच्या स्पर्धेत भाग घेत, सव्वा तासात अंतर पार करण्याची किमया केली. कोरोनानंतर ही स्पर्धा होत असल्याने एक वेगळा उत्साह होता. थंडीचा मौसम आणि सकाळी पहाटेच्या सुमारास गावात आणि मुंबईत पळण्याची मजा वेगळीच असते हे त्यांनी दाखवून दिले.
ढोल बाजे ढोल बाजे : हाफ मॅरेथॉन धावणारे अनेक स्पर्धक या ठिकाणी आले होते. एक युवक आपल्या राजस्थानी शैलीमध्ये 'ढोल बाजे ढोल बाजे' या गाण्यावर ढोल वाजवत होता. त्याने सगळ्यांचे लक्षणे वेधून घेतले. त्याच्या तालावर अनेकजण थिरकताना दिसले. रोशन नावाचा हा राजस्थान मधला छोटा कलाकार खास या कामासाठी इकडे आला होता. जे लोक धावून आले आणि आपली धावण्याची शर्यत पूर्ण केली ते या ठिकाणी नाचायला लागले होते.
हेही वाचा :Narayan Rane Vs Uddhav खोके मातोश्रीवरच पोहोचवले जातात, सांगायला लावू नका- नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा