मुंबई - दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात मंगळवारी केसरबाई नावाची चार मजली इमारत कोसळली. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातलगांना ५ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. तसेच जखमींवरील सर्वप्रकारच्या वैद्यकीय उपचारांचा खर्चही राज्य सरकारच करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
डोंगरी दुर्घटना : मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातलगांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर
या दुर्घटनेत एकूण १४ जणांचा मृत्यू झाला. तर ९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 7 पुरुष 4 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या दुर्घटनेत एकूण १४ जणांचा मृत्यू झाला. तर ९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ७ पुरुष ४ महिला आणि ३ लहान मुलांचा समावेश आहे. एनडीआरएफ, मुंबई अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने अद्यापही घटनास्थळी ढिगारा उचलण्याचे काम सुरू आहे. ढिगार्याखाली ४० हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.