मुंबई - महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर झाले आहे. सर्वच्या सर्व ४३ मंत्र्यांना खात्याचे वाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय यासह इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेल्या खात्यांचा कार्यभार असणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे असणार 'या' खात्यांचा कारभार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय यांसह इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेल्या खात्यांचा कार्यभार असणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे असणार 'या' खात्यांचा कारभार
महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले आहे. शनिवारी रात्री उशिरा नवनिर्वाचित मंत्र्यांच्या खात्यांची यादी राज्यपालांना देण्यात आली होती. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. खातेवाटपात उद्धव ठाकरे त्यांच्याकडे कोणते खाते ठेवतात याची सर्वांना उत्सुकता होती.