मुंबई: Central Railway: टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांनी आंदोलन केल्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस कडे येणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसकडून टिटवाळाकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत. passengers staged protest Titwala railway station
Central Railway: मध्य रेल्वेचा नेहमीच खोळंबा; टिटवाळा रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी केले आंदोलन
Central Railway: टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांनी आंदोलन केल्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसकडून टिटवाळाकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत. passengers staged protest Titwala railway station
कामावर जाण्यासाठी नागरिकांना त्रास: रोज रोज टिटवाळामध्ये लोकल पंधरा मिनिटे उशिरा येते, लोकल उशिरा आल्यामुळे कामावर जाण्यासाठी नागरिकांना त्रास होतो. कार्यालयात कामावर वेळेवर जाता येत नाही. परिणामी वरिष्ठ अधिकारी व्यक्तींचा ओरडा पडतो. तसेच वेळ आणि पैसा देखील वाया जातो.
नागरिकांनी अचानकपणे रेल रोको आंदोलन केले:या सर्व गोष्टींचा उबग आल्यामुळे आज टिटवाळा या रेल्वे स्थानकाच्या दरम्यान नागरिकांनी अचानकपणे रेल रोको आंदोलन केले आहे. त्यामुळे काही काळ धावपळ आणि गोंधळ रेल्वे स्थानकात झाला परिणामी लोकल ट्रेन दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहे.