मुंबई - दिवाळी सणाला ज्याप्रमाणे फराळ केला जातो, त्याप्रमाणे नाताळला फराळ करून हा सण ख्रिस्ती समाज साजरा करतो. या सणाला खास महत्त्व असून तेवढंच महत्त्व या सणादरम्यान बनविण्यात येणाऱ्या फराळालाही आहे.
ख्रिसमसचा निमित्त अस्सल पदार्थांची मेजवानी हेही वाचा - जळगावात अवकाळी पाऊस; रब्बीच्या पिकांना फटका
वर्ष संपायला काही दिवसांचा कालावधी उरला आहे. 25 डिसेंबरला येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आपल्या देशात दिवाळी सणासारखाच उत्साह नाताळ सणामध्येही असतो.
25 डिसेंबरला मध्यरात्री 12 च्या दरम्यान एकमेकांना गळाभेट देत ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या जातात. त्यानंतर हा सण साजरा करायला सुरवात होते. शुभेच्छा देणे, पाहुण्यांना घरी बोलावून त्यांना गोड पदार्थांचा पाहुणचार करणे, ख्रिस्ती बांधवांचा हा दिनक्रम नाताळ संपेपर्यंत सुरू असतो.
नाताळ दिवशी फराळाचे वेगवेगळे प्रकार तयार केले जातात. केक, करंजी, कलकल, रवा लाडू, फ्रुट केक, चॉकलेट फझ, माजपेन, पेरूची बर्फी, डेड रोल, जिरा स्टिक्स, रोस कुकीस असे विविध पदार्थ यावेळी तयार करण्यात येतात. एक वेगळाच आनंद हे पदार्थ बनवताना मिळतो. या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी नातेवाईक आणि मित्र परिवाराला बोलवण्यात येते. त्यांना हे पदार्थ देऊन त्याचे तोंड गोड करण्यात येते. जेवणाचा बेत केला जातो. तसेच नृत्य करून आनंद साजरा करण्यात येतो. यावेळी घर सजवण्यात येते. ख्रिसमस ट्री बनवण्यात येतो. नातेवाईकांना बोलवण्यात येते. जेवणाचा बेत केला जातो. एक वेगळाच आनंद या दिवसात मिळतो, असे प्रभादेवी येथील क्रिश्ति मयेकर-अल्मेडा यांनी सांगितले.
विशेष पदार्थ - कलकल
कलकल म्हणजे रवा आणि मैदापासून बनणारा पदार्थ. रव्यापासून लाडू तयार करण्यात येतात. केकाशिवाय तर ख्रिसमस साजराच होऊ शकत नाही. तो फळांपासून तयार करण्यात येतो. काजूपासून माजपेन बनवण्यात येते. पेरूची बर्फी तर स्पेशल असते. लाल पेरूची पेस्ट बनवून वडी तयार करण्यात येते. खजूर आणि शेंगदाणे यापासून देट रोल बनवण्यात येतात.