महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ब्रिटीशकालीन पाणपोई वापराविना बंद, वाटसरू तहानलेलेच

या ऐतिहासिक पाणपोईंची काळजी घेतली जात नाही. शिवाजी पार्क आणि शिवसेना भवन समोरही हेरिटेज पाणपोई आहे. दक्षिण मुंबईत अशाप्रकारच्या अंदाजे ५० पाणपोई आहेत.

By

Published : Apr 26, 2019, 12:06 PM IST

ब्रिटीशकालीन पाणपोई

मुंबई -वाटसरूंना तहान भागवता यावी, यासाठी ब्रिटीश काळात पाणपोईंची सुविधा मुंबईत करण्यात आली होती. परंतु, संबधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने या पाणपोई शेवटच्या घटका मोजत आहेत. विशिष्ट आकाराच्या असणाऱ्या या पाणपोई सर्वांच्या लक्ष वेधून घेत होत्या. सध्या त्या वापराविना बंद आहेत.

पाणपोईंच्या समस्येविषयी मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया

पिण्यासाठी १ लिटर पाणी हवे असेल तर २० रुपये मोजावे लागतात. गरीबांना ते परवडत नाही. वाटसरूंची तहान भागावी, या हेतूने ब्रिटिशकाळात पाणपोया तयार करण्यात आल्या. या पोणपोईंना हेरिटेजचा दर्जा देण्यात आला आहे. या ऐतिहासिक वास्तुंची काळजी घेतली जात नाही. शिवाजी पार्क आणि शिवसेना भवन समोरही हेरिटेज पाणपोई आहे. दक्षिण मुंबईत अशाप्रकारच्या अंदाजे ५० पाणपोई आहेत.

याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की या पाणपोईंकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. मध्यंतरी मनसेने देखील हा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु शासन निष्क्रिय असून याकडे त्यांचे लक्ष नाही. कोणताही राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता अशा सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यावर बोलायला तयार नाही. फक्त एकमेकांची उणीदुणी काढयाला तयार असतात. खरेतर अशा पाणपोई सुरू केल्या पाहिजेत. नागरिकांना त्याची गरज आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना दुकानातून पाणी विकत घ्यावे लागते. ही महानगरपालिकेसाठी दुर्देवी बाब आहे.

दादर येथील स्थानिक प्रमोद खळे यांनी सांगितले की, मी १९९५२ साली पाणपोईचा वापर केला होता. तेव्हा मी ५ वर्षाचा होतो. आज महागाईच्या काळात पाणपोईची गरज आहे. त्या पुन्हा सुरू करण्यात आल्या पाहिजेत. अनेक पाणपोई तोडण्यात आल्या आहेत. असे दादर येथील स्थानिक प्रमोद खळे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details