महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लैंगिक शोषणात पीडितेने साक्ष फिरवल्यास आरोपीने स्वतःला निर्दोष सिद्ध करावे - उच्च न्यायालय

लैगिक शोषणाप्रकरणी (पोक्सो) पीडीत अल्पवयीन मुला-मुलीने साक्ष फिरवल्यास, निर्दोष असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीची आहे. असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

By

Published : Feb 20, 2019, 3:16 PM IST

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई - लैगिक शोषणाप्रकरणी (पोक्सो) पीडित अल्पवयीन मुला-मुलीने साक्ष फिरवल्यास, निर्दोष असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीची आहे. असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठाने एका अल्पवयीन पीडितेच्याप्रकरणात हा निर्णय दिला.

मुंबई उच्च न्यायालय


मुंबईतील गोवंडी परिसरातील एका आरोपी युवकाने ९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. तेव्हा पीडित अल्पवयीन मुलगी व तिच्या आजीने यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करत आरोपीला अटक केली होती. न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, पीडित अल्पवयीन मुलगी व तिच्या आजीकडून कोर्टातील दिलेली साक्ष फिरवली.


तेव्हा बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपीला निर्दोष सोडण्याची मागणी केली. मात्र, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीची साक्ष, पोलीस पंचनामा आणि वैद्यकीय अहवालावर आरोपीला निर्दोष सोडण्यास नकार दिला. यावेळी लैंगिक शोषणप्रकरणी (पोक्सो) पीडीत अल्पवयीन मुला-मुलीने साक्ष फिरवली, तरी निर्दोष असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीची आहे, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details