मुंबई - ड्रग्ज प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू संपली आहे. कोर्टाने म्हटले आहे की, युक्तिवाद लांबल्याने ऑर्डरला काही काळ लागेल. युक्तीवाद संपल्यावर न्यायालयाने जामिनासाठी पकरण राखून ठेवले आहे.
रियासह तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याच्याही जामीन अर्जावर सुनावणी झाली. या दोघांना जामीन मिळावा म्हणून त्यांचे वकील प्रयत्न करत आहेत. तर या आरोपींना जामीन मिळू नये, यासाठी एनसीबीचे वकिल प्रयत्नशील आहेत.
LIVE UPDATE :
- कोर्टाने म्हटले आहे की युक्तिवाद लांबल्याने ऑर्डरला काही काळ लागेल
- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुशांतसिंह मृत्यू प्रकरणातील संबंधित कोणत्याही खटल्याची चौकशी सीबीआयच करेल; हे प्रकरणदेखील सुशांतसिंगच्या केसशी संबंधित - न्यायालय
- सॅम्युअल मिरंडाचे वकील सुबोध देसाईंनी सुरू केला युक्तिवाद
- सॅम्युअल मिरांडा चे वकील - माझे अशील हाऊसहेल्पर आहे. त्यांनी सुशांतसिंग किंवा त्याच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे ड्रग्स खरेदी करायचा. माझा आशिलाची भूमिका मालक आणि नोकर होती आणि त्याखेरीज आणखी काही नाही.
- देसाई यांनी राम सिंग विरुद्ध सेंट्रल ब्यूरो ऑफ नारकोटिक्सच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला
- देसाई - नोकराला एनडीपीएस अंतर्गत दोषी ठरविण्यात आले.
- माझ्या अशीलकडून कोणतेही ड्रग्स एनसीबीला मिळाले नाही
- सुबोध देसाईंचा युक्तीवाद संपला
- अॅडव्होकेट राजेंद्र राठोड यांनी दिपेश सावंत यांच्यासाठी केली युक्तिवादाला सुरुवात
- दीपेश सावंत हा सुशांतसिंगचा गृह व्यवस्थापक होता
- अॅडव्होकेट राजेंद्र राठोड - दीपेश सावंतला जे मालकाने सांगितले ते त्याने केले.
- दीपेश सावंत ग्राहक नाही. पुरवठा करणारा नाही. तो त्याच्या मालकाने सांगितले तसे करत होता
- ASG अनिल सिंग ह्याचा युक्तिवाद -
- समाजात विशेषत: तरुणांमधे अमली पदार्थांचा गैरवापर सर्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
- न्यायालय - तर तुम्ही कारवाई का नाही करत?
- एएसजी - हा कायदा अमली पदार्थांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी बनवला आहे.
- न्यायालय - जर एखाद्या वडिलांनी जाचाला कंटाळून अंमली पदार्थ आपल्या मुलाला दिले तर आपण त्या पित्यास 10 वर्षांच्या तुरुंगात टाकाल का?
- एएसजी - जर तरुण लोकांचे जीवन बिघडवण्यास कोणीही जबाबदार असेल तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
- चौकशीची टाइमलाइन आणि ते सर्व कसे कनेक्ट होते ते दर्शविण्यासाठी एएसजीने सादर केला चार्ट
- एएसजी - हे एक ड्रग्स सिंडिकेट असल्याचं दिसत आहे, तसेच ते सर्व एकमेकांशी कनेक्टेड आहेत.
- या प्रकरणात एनसीबीला कुठलाही अधिकार नाही, असा अंतिम युक्तिवाद रियाचे वकील मानेशिंदे यांनी केला.
- रिया आणि शोविक जमीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी परत सुरू
- बलदेवसिंग जजमेंटचा संदर्भ देत रिया चे वकील मानेशिंदे यांचा पुन्हा युक्तिवाद सुरू
रियाच्या जामिनावर तिच्या वकिलांनी युक्तीवाद केला. यात त्यांनी रियाकडे ड्रग्ज अत्यंत कमी प्रमाणात मिळाल्याचे म्हटले आहे. यामुळे रियाला आणि तिचा भाऊ शौविकला जामीन मंजूर करावा, अशी मागणी वकिलांनी केली आहे.